🌟सामाजिक व राष्ट्रीयकार्य हेच यशाचे मुळ मानणारे पत्रकार डॉ.विजय निलावार.....!


🌟डॉ.विजय निलावार हे त्यांच्या शालेय शिक्षण काळातील मी त्यांचा एक शिक्षक म्हणून मला अभिमान वाटतो प्रा.डॉ.श.बा.व्यवहारे

( प्रासंगिक विशेष,शब्दांकन)                

 "पेराल ते उगवेल "हा निसर्ग नियमच आहे, तो अंगिकारणारा जीवनात यशोशिखरांवर पोचतो त्यामुळे हा मूलमंत्र अंगिकारून प्रत्येकानी जगल्यास आणि इतरांच्या बाबतही कृतीत आणल्यास सर्व भवंतू  सुखिन: साकारून "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"ह्याची अनुभूती येते,अस मानणारे हिंगोली येथील ज्येष्ठपत्रकार डॉ.विजय निलावार हे त्यांच्या शालेय शिक्षण काळातील मी त्यांचा एक शिक्षक म्हणून मला अभिमान वाटतो.काही बाबी अश्या असतात की त्या गुरूंची गरिमा वाढवणाऱ्या असतात अशी अभिमानास्पद सुखद घटना माझ्या जीवनातील ८३ व्यां वर्षी मला वाटते. माझे शिष्य म्हणवल्या जाणाऱ्या त्या काळात विद्यार्थी दशेत अन् आज एक नामांकित महत्वपूर्ण व्यक्तीमत्व म्हणून डॉ.विजय निलावार च्या बाबतीत घडल्याने धन्यता वाटते. केंद्र शासन,महाराष्ट्र शासन व अनेक राज्यस्तरीय सेवाभावी नामांकित संस्था, संघटना कडून सन्मानित  हिंगोलीतील ज्येष्ठ समाजसेवी पत्रकार आणि डॉक्टर असलेला माझा ६८ वर्षीय विद्यार्थी डॉ.विजय निलावार होय.म्हणतातना "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" ह्याची अनुभूती देखील ह्या निमित्तानं आहे, ती म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण पुरस्काराने मुख्यमंत्री आणि अन्य गणमाण्यांच्या हस्ते  सन्मानित शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, क्रीडा,सांस्कृतिक वाणिज्यिक आणि विविध सामाजिक राष्ट्रीय क्षेत्रातील हिंगोलीतील ज्येष्ठ समाजसेवक स्व.एकनाथदादा निलावार ,व आदर्श माता पुरस्काराने सन्मानित मातोश्री स्व. शशिकलाबाई ह्यांच्या पोटी जन्माला आलेले डॉ.विजय निलावार, हे व्यक्तिमत्त्व.प्रथम गुरु म्हणजे आई वडील,नंतर मला विद्यादान करणारी गुरुजन मंडळी आणि माझ्या वयाच्या ६८ व्या वर्षात देखील सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची  शिकवण देणारी गुरुतुल्य मंडळीं होय अशी त्याची मान्यता आहे. मुळातच १४ ऑक्टोबर १९५६ ला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या धम्मचक्र परिवर्तन दिनी जन्माला आलेल्या डॉ. विजय निलावार ह्यांना कार्यगौरवार्थ महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र पुरस्काराने सन्मानित केलय,तर महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र/समाजभूषण संघाचे राज्यकार्याध्यक्ष असल्याने भारतीय संविधान कर्त्या समवेत असलेला हा एक रुणानुबंधच म्हणावा लागेल.डॉ विजय निलावार हे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा प्रसिध्दी प्रमुख,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे हिंगोली जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,ग्राहक संरक्षण परिषद हिंगोली जिल्हा सदस्य,आदी अनेक पदी कामगिरी बजावत आहेत.१९७४ साली  वैद्यकीय व्यवसाय,समाजसेवा आणि पत्रकारिता अश्या विविध क्षेत्रात त्यांनी सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा समाजसेवा व पत्रकारितेतून सेवाकार्य सुरू केले.वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कारकीर्द सुरू केल्या नंतरही त्यांनी वैद्यकीय व्यवसाय हा निव्वळ व्यवसाय न ठरता ते एक सेवाव्रत्त आणि माध्यम ठरावे म्हणून रुग्ण कल्याणार्थ  समाज कल्याणार्थ संकल्प केला तसाच पत्रकारिता संदर्भात ही निर्णय घेतला.कुठलीही तपासणी शुल्क न घेता अखंडित तब्बल ४८ वर्ष रुग्ण सेवा केली व करीत आहेत.एकीकडे दवाखाना चालवण्याच टेबल वर्क तर दुसरीकडे समाजसेवा पत्रकारिता आणि विविध समित्यांवर राहून सेवाकार्य,फील्डवर्क करण्याच बाहेर फिरून सेवा देण्याचं मोठ आव्हान ह्या दोन्ही परस्पर विविध बाबी हाताळून त्यावर यशस्वी होणे हे जिकररीचेच,असे असताना 

 त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर ही अखंडित सेवाकार्य केले. ह्यात विशेष कार्यकारी अधिकारीपद, पत्रकारितेच्या क्षेत्रातील विभागीय अधिस्वीकृती समिती चे सदस्य,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता व नागरी स्वच्छ्ता विभागीय मूल्यमापन समिती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा समितीचे तीन वेळा सदस्य, महाराष्ट्र मानव विकास मिशन महाराष्ट्र राज्य चे जिल्हा सदस्य,पर्यावरण समिती सदस्य,महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा विश्वस्थ व मेळावा मूल्यमापन समिती सदस्य, बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग विश्वस्त,महाराष्ट्र इलेक्शन वॉच जिल्हा समन्वयक,विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र वर्किंग जरन्यालिस्ट युनियन,जिल्हा सचिव प्रोफेशनल एज्युकेशन रिजनल  ॲक्शन कमेटी,"वनराई" जिल्हा प्रमुख,राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण सोसायटी,राष्ट्रीय एड्स नियंत्रण सोसायटी,साक्षरता अभियान,डी पी.ई.पी.व प्रौढ शिक्षण समिती,राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्व विचार संवर्धन समिती,सर्व शिक्षा अभियान समिती,गणित जत्रा समिती व थिंक टँक शिक्षण विभाग समिती,शिवकालीन पाणी पुरवठा व जलसंधारण समिती,जलयुक्त शिवार अभियान प्रचार प्रसिध्दी  समिती,नॅशनल ग्रीन कोपर्स इम्पलिमेंटेशन अँड मॉनिटरिंग कमेटी, गुटखा बंदी टास्क फोर्स,जिल्हा पर्यावरण समिती,जिल्हा अपारंपारिक ऊर्जा सल्लागार समिती,महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम मूल्यमापन समिती, जिल्हा लसीकरण टास्क फोर्स समिती,जिल्हा नाविन्यता परिषद,सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास समिती,नेहरू युवा केंद्र संघटन   युवक मंडळ मूल्यमापन समिती,कोरोना महामारी निर्मूलन व नियंत्त्रणार्थ विविध समित्या,आपत्कालीन परिस्थितीत गठित विविध समित्या,भूकंप,महापूर आणि नैसर्गिक आपत्ती

 ग्रस्तांसाठी निधी व आवश्यक जीवन उपयोग साहित्य संकलनासाठी त्या त्या वेळच्या सेवेतील सहाय्य समित्या आदी अनेक समित्यांवरील त्यांचं  सेवाकार्य  वाखाणल्या गेल आहे.ह्या सर्व सेवाकार्य गोरवार्थ  डॉ.विजय निलावार ह्यांना महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण पुरस्कार व  डॉ.बाबासाहेबआंबेडकर दलीत मित्र पुरस्कार,केंद्र शासनाने आदर्श युवा पुरस्कार,आदींनी सन्मानित केले आहे.ह्याशिवाय त्यांना महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार,संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कार, ग्राहक चळवळीचे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ समाजसेवक ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी च्या हस्ते कै.जयंतराव अष्ठपुत्रे सामाजिक प्रबोधनपर पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार, कै.अनंत भालेराव स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार,दखल सेवाभावी पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार,राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता पुरस्कार,स्वच्छतादुत पुरस्कार,भाई जगताप मित्र मंडळाचा राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार,वैद्यकीय क्षेत्रातील धन्वंतरी पुरस्कार,अंकुर शोध पत्रकारिता राज्य स्तरीय प्रथम पुरस्कार,दैनिक तरुण भारत उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,आकाशवाणी दूरदर्शन (प्रसार भारती)सेवानिवृत्त प्रतींनीधी,दे एकमत,दै.लोकसत्ता,दै. गोदातीर समाचार,दै.महानगर,चे जिल्हा  प्रतिनिधी भरारी त्रेमासिक व वासवीरत्न चे उपसंपादक,म्हणून सेवा दिल्या आहेत.

"वनराई" चे संस्थापक योजना आयोगा चे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण स्व.मोहन धारिया,आंतरराष्ट्रीय पातळीचे नेत्र शल्यचिकित्सक व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक पद्मश्री वंदनीय डॉ.श्री प्रतापसिंहजी हरदिया   इंदूर,तत्कालीन केंद्रीय ग्राम विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील ,तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख,माजी खासदार व मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक डॉ.व्यंकटेश रुखमाजी काब्दे,ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार, नांदेड,तत्कालीन खासदार विलासराव गुंडेवार हिंगोली,तत्कालीन खासदार डॉ.गोपाळराव पाटील लातूर,तत्कालीन गृहराज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,अमेरिकेतील ज्येष्ठ समाजसेवक व डॉक्टर सौ लता आणि डॉ.अनंत लाभशेटवार,लाभशेटवार फाउंडेशन अमेरिका, महाराष्ट्र मानव विकास मिशनचे अध्यक्ष कृष्णा भोगे,

ज्येष्ठपत्रकार सर्वश्री संपादक अरुण टिकेकर, कुमार केतकर निखिल वागळे,तत्कालीन संपादक एकमत,अरुण साधू, राजा माने,प्रवीण बर्दापूरकर,दै.तरुणभारत,दै. एकमत,दै.महानगर दै.लोकसत्ता,दै.गोदातीर समाचार,आकाशवाणी दूरदर्शन (प्रसारभारती),चे वृत्त विभागातील सर्व स्टाफ, सह्याद्री वाहिनीचे तत्कालीन वृत्त संचालक सुदर्शन पंनतोडे,व स्टाफ, आकाशवाणी दूरदर्शन पत्रकार संघटनां राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अभयशंकर गौर,स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर,आदी अनेक गुरुस्थानी असल्याने हे यश संपादन झाल असल तरीही मी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी दशेतच राहून शिकत राहणार अस डॉ.विजय निलावार ह्यांनी म्हंटले आहे.ह्या सर्व बाबींचे अवलोकन केल्यास वैद्यकीय क्षेत्रा सह सामाजिक आणि राष्ट्रीय सेवाकार्य एकत्रित करण्यासाठी डॉ.विजय निलावार ह्यांनी वयक्तिक व पारिवारिक जीवनात सहन केलेली झीज निश्चितच प्रेरणादायी म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही,हे मात्र खरे. ह्या सर्व जिवन प्रवासात मोलाची साथ दिलेल्या मातृ पितृ पत्नी,मुलगा,सून, मुलगी जावई ,बहिणी,भावजी समस्त निलावार परीवारासह  सर्वच आप्तेष्ट मित्र मंडळींचां  ऋणनिर्देश शब्द रुपात व्यक्त करणे क्रमप्राप्त असल्याने  डॉ.विजय निलावार ह्यांनी  कृतज्ञता व्यक्त केली आहे.सुंदर देह घेवून जन्माला येणं ही आई वडिलांकडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते,पण एक चांगल व्यक्तिमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते,जीवनात निष्ठेने आणि तत्वाने जे लाभत तेच आयुष्याच्या बेरजेत शिल्लक राहत,तर बाकी सर्व नियतीच्या वजाबाकित गायब होत अश्या शब्दात डॉ विजय निलावार ह्यांनी सुविचार व्यक्त केला आहे......

 ✍️शब्दांकन - प्रा.डॉ.श.बा.व्यवहारे 

सेवा निवृत्त,मराठी विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या