🌟या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग दुधाटे,कैलास काकडे सय्यद सादेक यांनी परिश्रम घेतले🌟
परभणी :- परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय मुले व मुली थ्रो बॉल क्रीडा शालेय स्पर्धा संपन्न झाली जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.19. ऑक्टोंबर रोजी शहरातील सिटी क्लब मैदानावर करण्यात आले होते. यावेळी मनचावर मनपा क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास माने. उद्घाटक. धनंजय बनसोडे. राजाभाऊ. तांत्रिक समिती प्रमुख महेश कुमार काळदाते. विश्वास पाटील. आदित्य गायकवाड. मनीष जाधव. सचिन जाधव.हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटक धनंजय बनसोडे यांनी शालेय विद्यार्थ्यांनी थ्रो बॉल स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेमध्ये विविध शाळेतील संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये 14. वर्षातील मुलांच्या गटा त बाल विद्यामंदिर व मुलींच्या गटात अरविंद अक्षर ज्योती यांनी प्रथम क्रमांक.17. वर्ष मुलाच्या वयोगटात नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिक शाळा व मुलीच्या गटात जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी. यांनी प्रथम क्रमांक मिळवला. व तसेच 19 वर्ष मुलाच्या गटात नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिक शाळा तर मुलीच्या गटात.कै. रावसाहेब जामकर महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक मिळवत सर्व संघ. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले सर्व खेळाडूचे. कैलास माने क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव व उपस्थित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग दुधाटे. कैलास काकडे सय्यद सादेक यांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या