🌟दरम्यान जागा वाटपातून परभणीची जागा भाजपाला निश्चितपणे सुटेल असा विश्वास वरपुडकर यांनी व्यक्त केला🌟
परभणी (दि.२४ आक्टोंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर यांनी आज गुरुवार दि.२४ आक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महायुतीतील जागा वाटपा संदर्भात आज गुरुवारी दुपारपर्यंत श्रेष्ठींद्वारे निर्णय झाला नाही त्यामुळे परभणी विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी की शिवसेनेच्या शिंदे गटास बहाल होईल याबाबत स्पष्टतासुध्दा झाली नाही या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतील निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे वरपुडकर यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज घेवून गुरुवारी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर पक्षामार्फत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे खंदे समर्थक उपस्थित होते.
दरम्यान जागा वाटपातून परभणीची जागा भारतीय जनता पार्टीस निश्चितपणे सुटेल असा विश्वास वरपुडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केला आपण निश्चितपणे आशावादी आहोत, पक्षाद्वारे आपल्या अधिकृत उमेदवारीचा गांभीर्याने विचार होईल असेही ते म्हणाले.....
0 टिप्पण्या