🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते संभाजीनगरचे ग्रामदैवत कर्णपुरा मंदिर येथील आई तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना...!

              


🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना दिल्या शुभेच्छा🌟

 ✍️ मोहन चौकेकर      

संभाजीनगर : संभाजीनगरचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला गुरुवार, ता. ३ ऑक्टोंबर रोजी विरोधी पक्षनेते तथा मंदिर संस्थान अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे. शुभमुहूर्ताच्या प्रसन्न वातावरणात सकाळी ७ वाजता आरती करून समस्त भाविक भक्तांना त्यांनी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


आई भवानी आणि माता दुर्गेच्या भक्तीत विलीन होऊन हा उत्सव भक्तांनी साजरा करावा. नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसऱ्याच्या दिवशी राक्षस महिषासुराचा वध करण्यात येत असल्याची परंपरा आहे. राज्यातील दहा तोंडाच्या रावणाचा वध जनताच करणार असून आदिशक्तीचे रूप शक्ती आणि ऊर्जा देणारे आहे. कष्ट आणि दुःखी जनतेला सावरण्यासाठी आई तुळजाभवानी शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी अंबादास दानवे यांनी देवीच्या चरणी भावना व्यक्त करताना केली.

महाराष्ट्रात सध्या महिषासुराचे राज्य निर्माण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनताच या महिषासुराचे वध करणार आहे. या लोक कल्याणकारी कामाचे नेतृत्व महाविकास आघाडी व शिवसेना करणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आनंदाने हा उत्सव साजरा करावा अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, राजू राजपूत, संतोष मरमट,पोपटराव दानवे, संतोष दानवे, राजेंद्र दानवे,अंकूश दानवे, रमेश दानवे व अभिजीत पगारे उपस्थित होते......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या