🌟तुळजापूर मतदारसंघात पाच हजार बनावट मतदारांचे प्रयत्न उधळले,निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई....!


🌟बनावट आधार कार्ड तयार करून ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न🌟

तुळजापूर विधानसभा मतदार संघात काही तोतया मतदारांनी बनावट आधार कार्ड तयार करून ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ही संख्या जवळपास पाच हजार इतकी असल्याचे समजते.

मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न थोपवून धरला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खळबळ उडाली आहे या प्रकाराबाबतची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी दिली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या