🌟शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजु चापके यांनी भरला वसमत विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज🌟
हिंगोली (दि.२५ आक्टोंबर २०२४) - हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीत बंडखोरी झाल्याचे निदर्शनास येत असून महायुतीतील महत्वाच घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वसमत तालुकाप्रमुख राजु चापके यांनी आज शुक्रवार दि.२५ आक्टोंबर रोजी बंडखोरीचा निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीत खळबळ माजली असून तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजु चापके यांनी पक्षाकडे महायुतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली होती.
शिवसेना शिंदे गटाचे वसमत तालुका प्रमुख असलेल्या राजु चापके यांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत तसेच पुर्ण मतदारसंघ पिंजून काढत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरीकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम त्यांनी केले आहे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांची उमेदवारी पक्की मानली जात असतानाच महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समावेश झाला परिणामी विद्यमान आमदार राजु नवघरे हे विधानसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरीचे संकेत मिळाले होते. दरम्यान राजु चापके यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीचा रेटा लावून धरला होता मात्र महायुतीच्या यादीत विद्यमान आमदार राजु नवघरे यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर नाराज झालेल्या राजु चापके यांनी अखेर आज शुक्रवारी अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडाचा झेंडा फडकवला राजु चापके यांनी उमेदवारी दाखल केली असून उमेदवारी कायम राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजु नवघरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे....
0 टिप्पण्या