🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन / बातम्या......!


🌟 भारतीय जनता पार्टी आणखी अमित शाहांनी त्याग केला नाही महाराष्ट्राची लूट केली संजय राऊतांची टीका🌟 

✍️ मोहन चौकेकर

 💫 राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार ; शिंदे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी दिला राजीनामा, मनिषा कायंदे यांना विधानपरिषद आमदारकी दिल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा 

💫 जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेलच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास, महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर, विरोधकांवर हल्लाबोल ; कोणी आमच्याकडे आला की लगेच आम्ही सही करतो, ते तर पेन ठेवतही नव्हते, मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

💫मुख्यमंत्रिपद देताना आम्ही त्याग केला, जागावाटपात तुम्ही झुकतं माप द्यावं; अमित शाहांचा शिंदेंना आग्रह, सूत्रांची माहिती ; अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आमच्यातच लावू नका 

💫 महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवर  खल सुरुच; महायुतीकडून 240 जागांवर शिक्कामोर्तब, तर मविआकडून 220 जागा निश्चित, सूत्रांची माहिती ; जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मन मोठं करुन त्याग करावा, ज्याठिकाणी आम्ही जिंकतो ती जागा आम्हीच लढली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य ; सर्वात जास्त आमदार असताना देखील देवेंद्र फडणवीसांना मोठा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले, रवी राणांचं वक्तव्य  ; आमच्या त्यागामुळेच राज्याचे मुख्यमंत्री पद आणि महायुतीची सत्ता आली; शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया  

💫 अमित शाह आणि भाजपनं त्याग केला नाही, महाराष्ट्राची लूट केली, संजय राऊतांची टीका ; उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा ,खासदार अनिल देसाईंच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली 

💫महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुका जोरात लढवणार, राज ठाकरेंचा निर्धार, म्हणाले, जे बोललो ते बोललो, आता माघार नाही    

💫बारामतीबाबत पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट, युग्रेंद्र पवारांची  माहिती, बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत होण्याची शक्यता ; पिपाणी चिन्हाचा लोकसभेसारखा विधानसभेत परीणाम होणार नाही, तुतारी वाजवणारा माणूस सर्वांना समजला, रोहित पवारांचं वक्तव्य

💫 मला तो आवडतो, प्यार हैं तो हैं...निक्कीने दिली अरबाजबद्दलच्या प्रेमाची कबुली,    म्हणाली, त्याने माझ्या आईवडिलांसोबत बोलून सगळं क्लिअर केलंय  

💫मुंबई इंडियन्सने मोठा मासा लावला गळाला, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पारस म्हाम्ब्रे यांची  नवीन गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती ; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत पावसाचाच खेळ, पहिला दिवस पाण्यात, बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली 

💫केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी, लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा

💫दिलासादायक!  6 पिकांच्या हमीभावात वाढ, केंद्र सरकारनं घेतला  निर्णय 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या