🌟वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यनिष्ठता जोपासणारे मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या पाठीशी वाशीमकर जनता...!

 


🌟मुख्यकार्यकारी अधिकारी वाघमारे यांची बदली करण्यात येऊ नये विविध सामाजीक संघटना व पत्रकार संघाची मागणी🌟

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली करण्यात येऊ नये अशी मागणी विविध सामाजीक संघटनासह पञकार बांधवांच्यावतीने वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

               जिल्हा परिषद वाशिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर वैभव वाघमारे हे रुजू झाले आणि अल्पावधीतच लोकाभिमूख आणि पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकास कामांवर  छाप पाडली. मुळात वाशिम जिल्हा हा राज्यातील जिल्ह्यांच्या यादीत आकांक्षित असलेला जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येथे आय ए एस दर्जाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अपवादानेच लाभले आहेत. आयएएस अधिकारी  वैभव वाघमारे यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्ह्याला लाभले आहेत. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार वैभव वाघमारे यांनी योग्य प्रकारे हाताळल्यामुळे गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात अमुलाग्र बदल घडून आले आहेत.चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे ते कौतुक करत आहेत. तर कामचुकारांना वठणीवर आणत आहेत. त्यांच्या या कामगिरीवर जिल्ह्यातील समस्त जनता समाधानी असतांना काही कर्मचारी संघटनांनी वैभव वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली. यामुळे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी कशी काय होऊ शकते? हा प्रश्न जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यातील विविध  सामाजिक संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी तसेच गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींनी  याबाबत विचार विनिमय करून वाघमारे साहेबांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांची बदली होऊ नये. वैभव वाघमारे यांची कुठल्याही परिस्थितीत वाशिम येथुन बदली करू नये. जनभावनेचा आदर न करता त्यांची बदली केली गेल्यास सर्व  जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.विविध सामाजीक संघटना तसेच पञकार संघटनांनीही सिईओ साहेबांची बदली न करण्यासाठी पुढाकार घेवून मागणी केली आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या