🌟जिंतूर पोलीस स्थानकातही घातला गोंधळ : रुग्णालयात केली नासधूस🌟
परभणी (दि.१३ आक्टोंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ट्रामाकेअर सेंटरमधील एका परिचारिकेवर एका तरुणाने जिवघेणा हल्ला चढवत त्या परिचारिकेला निर्दयीपणे लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना दि.११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की जिंतूर ट्रामा केअर मध्ये कर्तव्य बजावत असलेल्या एका परिचारिकेकडे इमरान कुरेशी नावाचा तरुण हाताला जखम झाली म्हणून त्यावर तात्काळ मलमपट्टी करण्यासाठी रुग्णालयात आला होता मलम पट्टी करण्यास विलंब का करता ? असे म्हणत त्याने संबंधित परिचारिकेला अश्लील भाषेत शिव्या देत रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली त्यावेळी कर्तव्यावर असणार्या परिचारिका त्याला मलमपट्टी करण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे उपस्थित असणारे लखन राठोड यांनी त्या तरुणाला आवर घातला. त्यानंतर घाबरलेल्या परिचारिकांनी थेट जिंतूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, गर्भवती स्त्री परिचारिकेवर जीवघेणा हल्ला होतोय ही जिंतूरच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना. आहे. गत दोन महिन्यात एकाच महिला डॉक्टर दोन वेळा, पुरुष डॉक्टरवर एक वेळा, पुरुष परिचारिकावर एक वेळा आणि आता पाचव्यांदा एका महिला परिचारिकेचा विनयभंग करीत जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे......
0 टिप्पण्या