🌟परभणी जिल्ह्यात निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाई बाबत निर्बंध....!

 


🌟काय‌द्यातील तरतूदीचे उल्लघंन करुन छपाई केल्यास त्यांचे विरुध्द होणार कायदेशीर कार्यवाही🌟 

(विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024)

परभणी :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. 

भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेप्रमाणे लोप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 (क) अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाई बाबत निर्बंध घालण्यात येतात. त्याप्रमाणे छपाई कामे करणारे प्रेस धारक यांनी भित्तीपत्रके, इत्यादींच्या मुद्रणाचे दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. तसेच मुद्रित किंवा प्रकाशित करवता येणार नाही. मुद्रकाने पत्रक मुद्रित केल्यानंतर प्रकाशकाने स्वतःच्या सहीचे अधिकथन मुद्रकाला दोन प्रतीमध्ये देणे आवश्यक आहे. आणि ते मुद्रकाने जिल्हाधिकारी यांना दोन प्रतील देणे बंधनकारक आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र व मुद्रित दस्त ऐवजांच्या प्रती त्वरीत सादर करण्यात याव्यात. सर्व प्रिटींग प्रेस धारकांनी या बाबतीत अधिक माहीती करीता आणि प्रतिज्ञा पत्रांकरीता विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परभणी, गंगाखेड, पाथरी व जिंतूर येथे संपर्क साधावा.

जे कोणी मुद्रक कलम 127 (क) चे उल्लघंन करतील विधानसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांचे करीता काय‌द्यातील तरतूदीचे उल्लघंन करुन छपाई करुन देतील त्यांचे विरुध्द वरील अधिनियमातील तरतूदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. या बाबतच्या सविस्तर सूचना कार्यालयीन वेळेत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध असतील. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या