🌟महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर.....!


🌟पहिल्या यादीत 99 नावं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट 🌟

✍️ मोहन चौकेकर

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे.माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलाला तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

* भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर :-

1. नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस

2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे

3.शहादा - राजेश पाडवी

नंदूरबार- विजयकुमार गावीत

धुळे शहर -अनुप अग्रवाल

सिंदखेडा - जयकुमार रावल

शिरपूर - काशीराम पावरा

रावेर - अमोल जावले

भुसावळ - संजय सावकारे 

जळगाव शहर - सुरेश भोळे 

चाळीसगाव - मंगेश चव्हाण 

जामनेर -गिरीश महाजन 

चिखली -श्वेता महाले 

खामगाव - आकाश फुंडकर 

जळगाव (जामोद) - संजय कुटे 

अकोला पूर्व - रणधीर सावरकर

धामगाव रेल्वे - प्रताप अडसळ

अचलपूर - प्रवीण तायडे 

देवली - राजेश बकाने 

हिंगणघाट - समीर कुणावार 

वर्धा - पंकज भोयर 

हिंगना - समीर मेघे 

नागपूर दक्षिण - मोहन माते 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या