🌟भाजपा राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जाहीर केलेल्या यादीत आ.बोर्डीकर यांचेही नाव 🌟
परभणी (दि.२० आक्टोंबर २०२४) - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने आज रविवार दि.२० आक्टोंबर रोजी दुपारी महाराष्ट्रातील ९९ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली असुन या पहिल्याच यादीत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्या पाठोपाठ विदर्भ, खानदेश, मराठवाडाच्या काही जिल्ह्यातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव मधून राजेश संभाजी पवार, मुखेडमधून तुषार राठोड यांना तर हिंगोलीतून विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे, परतुरमधून माजी मंत्री बबनराव लोणीकर,बदनापूर मधून नारायण कूचे, भोकरदन मधून संतोष रावसाहेब दानवे,फुलंब्री मधून श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण, संभाजीनगर मधून अतुल सावे,गंगापूर मधून प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे......
0 टिप्पण्या