🌟परभणी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये उद्या ३१ आक्टोंबर रोजी सुरु राहणार....!


🌟दिपावली (नरक चतुर्दशी) निमित्त घोषित सुट्टी रद्द : 7 डिसेंबर रोजी सुटी जाहीर🌟

परभणी (दि.30 आक्टोंबर 2024) : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षातील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. त्यात 31 ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्थीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु, त्यात बदल करीत आता 7 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्यामुळे उद्या शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु राहणार आहेत.

              दि. 26 डिसेंबर 2023 च्या अधिसुचनेनुसार 31 ऑक्टोबर, 2024 रोजीची दिपावलीची (नरक चतुर्दशी) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याऐवजी दि. 4 जानेवारी 2024 च्या सुधारित अधिसूचनेनुसार दि. 7 डिसेंबर 2024 रोजीची चंपाषष्टीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि. 31 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील  शासनाची सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये नियमितपणे सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या