🌟परभणी जिल्हा कोषागार कार्यालयात 30 ऑक्टोबर पर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन🌟
परभणी (दि.14 आक्टोंबर 2024) : कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक आयकर अधिनियम 1961 नुसार आपल्या सन 2024-25 या आर्थिक वर्षातील एकुण आयकर पात्र निवृत्तीवेतन/उत्पनावर कर कपात करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व निवृत्तीवेतन धारक यांनी त्यांच्याकडील आयकर सूट मिळविण्यासाठी केलेल्या बचतीचे सर्व कागदपत्रे 30 ऑक्टोबर, 2024 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय परभणी येथे सादर करावीत.
आयकर अधिनियम 1961 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा नुसार सध्या जुनी कर प्रणाली व नवीन करप्रणाली अश्या दोन पद्धती अस्तित्वात असून आपल्याला वरील कोणतीही एक कर प्रणाली निवडण्याची मुभा दिलेली आहे. त्यानुसार सर्व निवृत्तीवेतन धारक यांनी वरील पैकी कोणतीही एक कर प्रणाली निवडले बाबत या कार्यालयास दि. 30 ऑक्टोबर, 2024 पर्यंत लेखी कळविण्यात यावे. अन्यथा नवीन करप्रणाली प्रमाणे आपला आयकर कपात करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या