🌟परभणी जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करावा.....!


🌟जिल्हा कोषागार अधिकारी दत्ता भांगे यांचे निवृत्तीवेतन धारकांना आवाहन🌟 

परभणी :- परभणी जिल्हा कोषागारामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात हयात दाखला सादर करणे आवश्यक आहे. हयात दाखला नोंदविण्यासाठी बँकेत यादी पाठविली असून, तो बँकेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दत्ता भांगे यांनी केले आहे.

निवृत्तीवेतन सुरु ठेवण्याकरिता 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष बँकेत उपस्थित राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच कार्यरत मोबाईल क्रमांक, पुनर्विवाह व पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पद्धतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरीता http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. या यादीत स्वाक्षरी अथवा अंगठा अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला नसलेल्यांचे डिसेंबरपासून निवृत्तीवेतन अदा केले जाणार नसल्याचे दत्ता भांगे यांनी सांगितले आहे....

*-*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या