🌟भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा देगलूर-बिलोलीचे माजी आ.सुभाष साबणे यांची भाजपला सोडचिठ्ठी.....!


🌟भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले राजीनामापत्र🌟


 
नांदेड :- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबने यांनी आज शनिवार दि.१९ आक्टोंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रकांत बावनकुळे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार सुभाष साबने यांनी असे नमूद केले आहे की मी माझ्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदासह पक्षाच्या इतर सर्व पदांचा राजीनामा माझ्या वैयक्तिक कारणांमुळे देत आहे.

कृपया माझा राजीनामा स्विकार करावा असेही राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात मा.आ.सुभाष साबणे यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चर्चा कुचर्चांना उद्यान आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या