🌟आता परिवर्तन होणार मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंना विश्वास🌟
✍️ मोहन चौकेकर
💫 दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सीना नदीत 4 ऊसतोड कामगार बुडाले, शोधकार्य सुरु, माढा तालुक्यातील खैरावमध्ये घडली घटना ; बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात तीन जणांचा मृत्यू, ऐन दिवळीत अपघात झाल्यामुळं सर्वत्र हळहळ ; कर्ज देत नसल्याच्या कारणावरुन बँक मॅनेजरवर कोयत्यानं हल्ला, मॅनेजर गंभीर जखमी, सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली घटना
💫 पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसणार का ? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं,
💫 चिंचवड विधानसभा मतदारंसघातून निवडणूक लढवणारच अजित पवारांच्या भेटींनतरही नाना काटे बंडखोरीवर ठाम
💫 आर आर आबा हे इमानदार होते अजित पवारांची फायनल चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली, सुप्रिया सुळेंचा दावा ; अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील, मी माफी मागते, आर. आर. पाटलांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया ; तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील निवडणुकीच्या मैदानात
💫 मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, सायन-कोळीवाडा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यानं होते नाराज ; रवी राजा आणि आमचा संबंध संपला, आता जिथे आहे तिथे राहावं,वर्षा गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया; नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा तब्बल 4 दिवसानंतर घरी परतले, एकनाथ शिंदे विश्वासू, पण त्या लोकांना सोडणार नाही ; राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणाले, भाजपला 50 जागा देखील मिळणार नाहीत
💫 आता परिवर्तन होणार मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंना विश्वास, 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार ; देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, दलित, मुस्लीम व मराठा असा विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला
💫 कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधवांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, सतेज पाटलांना धक्का ; कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधवांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं राजकीय समीकरणं बदलणार, कोणाला फायदा कोणाला तोटा होणार ?
💫 छातीत दुखत असल्याने वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयात केलं दाखल,अँजिओग्राफी होणार, सध्या प्रकृती स्थिर ; बाळासाहेबांची प्रकृती स्थिर तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा ; पुत्र सुजात आंबेडकर यांनी दिली तब्बेत्तीची माहिती
💫 निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना बार्शी तालुक्यात मोठा धक्का, निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटाच प्रवेश, दिलीप सोपलांना मिळणार पाठबळ ; तारखेपर्यंत काँग्रेसनं सोलापूर मध्यतून उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसचं षडयंत्र बाहेर आणणार, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचा इशारा
💫 जब्याला काळ्या चिमणीची राख घावली, सोमनाथ अवघडे आणि राजश्री खरातची लगीनगाठ? इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळं चर्चांना उधाण ;
💫 केदारनाथमध्ये एकत्र आशीर्वाद घेतला, सारा अली खान नेत्याच्या मुलाला करतेय डेट? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चा रंगली
💫 आयपीएल 2025 साठी बुमराहला 18 कोटी, सूर्याला 16 कोटी, मुंबईकडून 5 खेळाडू रिटेन, एमएस धोनी ही चेन्नईकडून खेळणार
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या