🌟पुर्णा येथील महाराष्ट्र बॅंक शाखेतील प्रकार : रक्कम पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी महिला पोलिसांच्या स्वाधीन🌟
पुर्णा (दि.१९ आक्टोंबर २०२४) : पुर्णा शहरातील महाविर नगर परिसरातील स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत उमडलेल्या गर्दीचा फायदा घेऊन बँकेतल्या खात्यावरील रक्कम काढण्यास आलेल्या बॅंक ग्राहक वृध्द महिलेने आपल्या पिशवीत ठेवलेली तब्बल ४५ हजार रुपयांची रक्कम पिशवीसह चोरुन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी महिलांचा प्रयत्न बॅंकेतील कर्तव्यदक्ष लिपीकांच्या सतर्कतेमुळे फसल्याची घटना दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ०१.३० ते ०२.०० वाजेच्या सुमारास घडली दरम्यान बॅंक लिपीक यांनी सदरील दोन चोरट्या महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजते.
या घटने संदर्भात भिमराव उमाजी जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुर्णा पोलीस स्थानकात नमूद दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नळगीकर हे करीत आहेत यापुर्वी देखील पुर्णा शहरातील बॅंकामध्ये रक्कम काढण्यास गेलेल्या बॅंक ग्राहक, शेतकरी,पेन्शनर यांच्यावर पाळत ठेवून त्यांची रक्कम पळवण्याचे प्रकार घडल्याच्या घटना उघडकीस आल्या या घटनांतील एकही आरोपीचा पोलीस प्रशासनाला शोध लावता आला नाही परंतु या घटनेत मात्र बॅंकेतील लिपीकांनी कमालीची सतर्कता दाखवून वृध्द महिलेची ४५ हजार रुपयांची रक्कम तर वाचवलीच याहीपेक्षा कौतुकास्पद बाब म्हणजे दोन अनोळखी चोरट्या महिलांना देखील रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांच्या या सतर्कतेसह त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वस्तरातून कौतुक केले आहे.....
0 टिप्पण्या