🌟परभणीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्येचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत किशोरजी व्यास यांचे उद्या दि.२३ रोजी व्याख्यान....!

 


🌟डॉ.पद्मजा सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित स्व.डॉ.ललित सोमाणी यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यान🌟 

परभणी (दि.२२ आक्टोंबर २०२४) : परभणी शहरातील डॉ.पद्मजा सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित स्व.डॉ.ललित सोमाणी यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त स्मृति व्याख्यानमालेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्येचे कोषाध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमी मथूरा चे उपाध्यक्ष राष्ट्रसंत प.पु.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे बुधवार २३ ऑक्टोंबर रोजी परभणीत व्याख्यान होणार आहे.

            अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत प.पु. गोविंददेव गिरीजी महाराज हे ‘राष्ट्रदैवत छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान देणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन  इंजि. रामप्रसाद सोमाणी, डॉ. नितीन सोमाणी, सुशील सोमाणी व ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या