🌟कर्णपुऱ्यातील आई तुळजाभवानी मंदिरात पारंपारिक वाद्यांसह सनई चौघडांच्या गजरात सकाळी सातला होणार घटस्थापना🌟
✍️ मोहन चौकेकर
संभाजीनगर : संभाजीनगरचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून गुरुवार, ३ ऑक्टोंबर रोजी पहिल्या माळेला पारंपारिक वाद्य आणि सनई चौघडांच्या गजरात मनोभावे घटस्थापना करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ७ वाजता मंदिर संस्थान संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची मंगलमय वातावरणात भाविकांच्या उपस्थितीत आरती संपन्न होणार आहे.
छावणी परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षा व आरोग्य दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहे. सुरक्षितेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असुन पोलीस कर्मचारी व मोठ्या संख्येने स्वयंसेवक हे सुद्धा संपूर्ण नवरात्र उत्सव पार पडेपर्यंत आपली सेवा देणार आहे. छावणी परिषद स्वच्छता कर्मचारी व संभाजीनगरातील सामाजिक संस्था यात्रेच्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार आहे .
नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात आली असून उत्तम प्रकारची आकर्षक विद्युत रोषणाई ही केलेली आहे. भाविकांना आपल्या भक्तीची श्रद्धापूर्वक जगदंबेच्या प्रती असलेली भावना प्रकट करता येणार आहे. तसेच सत्कर्यासाठी माताच्या चरणी भक्तांनी केलेले नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी असली तरीही कसल्याही प्रकारची असुविधा होणार नाही व तशी काळजी घेण्यात येत असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवाच्या मंगलमय काळात आई तुळजा भवानीचे भक्तिमय वातावरणात दर्शन घेण्यासाठी व आराधना करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. जगदंबेच्या भक्तांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये म्हणून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंदिर असलेले व संस्थान संस्थापक अध्यक्ष असलेले अंबादास दानवे, जगन्नाथ दानवे, पोपट दानवे, रमेश दानवे, अंबादास भानुदास दानवे, अंकुश दानवे, सुरेश दानवे व संतोष दानवे हे यात्रेच्या व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवून आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या