🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषद सदस्य पदावर आवरगंड यांची निवड...!


🌟पुर्णा तालुक्यातील माखणीतील प्रयोगशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून होतेय अभिनंदन🌟  

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रयोगशील शेतकरी तथा कृषीपुरक उद्योजक जनार्धन बालासाहेब आवरगंड यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या विस्तार शिक्षण परिषदेवर (अभ्यास मंडळ) सदस्य म्हणून निवड झाली आहे.     

          महाराष्ट्र शासन  कृषी विद्यापीठ परभणी नियमावली 1990 च्या अधीन राहून  डॉ. कुलगुरू ईद्र मनी यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी च्या विस्तार शिक्षण परिषदेवर सदस्य प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांची  नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक  भ. वी. असेवार यांच्या स्वाक्षरीने पुढील तीन वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे कृषि क्षेत्रात उपक्रमशील शेतकरी कांतराव झरीकर,पंडीत थोरात, प्रकाश हरकळ,रामेश्वर साबळे, विद्याधर संघई, सुरेक्ष शृंगारपुतळे, गोविंद दुधाटे, विजयकुमार कदम, विजय जगले आदीनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या