🌟परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राहुल पाटील यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन....!



🌟युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भरला विधानसभा उमेदवारी अर्ज : महाविकास आघाडीच्या उपस्थिती🌟



 परभणी (दि.२९ आक्टोंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आज मंगळवार दि.२९ आक्टोंबर रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरातून दुपारी १२.०० वाजता महाविकास आघाडीच्या या संयुक्त रॅलीस प्रारंभ झाला. नानलपेठ कॉर्नर, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर, नारायण चाळ चौक मार्गे रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराकडे प्रस्थान केले. या रॅलीत मोठ्या वाहनावर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार संजय जाधव, खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, लक्ष्मणराव वडले, माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे, सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे,संतोष बोबडे काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीन इनामदार तसेच मारोतराव बनसोडे आदी विराजमान होेते.
               या रॅलीत हजारो समर्थक सहभागी होते. शहरी व ग्रामीण भागातील समर्थकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. भगवे झेंडे, निळे झेंडे, गळ्यामधून भगवे रुमाल, निळे रुमाल घालून कार्यकर्ते महाविकास आघाडीचा जयघोष करीत मोठ्या उल्हासात होते. ठिकठिकाणी या कार्यकर्त्यांनी बॅन्ड असो, अन्य वाद्यांच्या तालावर बेफाम नृत्य केले. जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ दणाणली. तर ठिकठिकाणी व्यापार्‍यांसह अन्य संस्थांनी या रॅलीचे स्वागत केले.
या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात समारोप झाला. या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरफान ऊर रहेमान खान, सुशिलभैय्या देशमुख, विकास लंगोटे, अनिल डहाळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, माजी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री खोबे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, सौ. अंबीका डहाळे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांची जोरदार भाषणे झाली.
                खासदार जाधव व खासदार  श्रीमती खान यांनी महायुतीच्या सरकारवर आपल्या भाषणातून टिकेचा भडीमार केला. महायुतीच्या या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना फसविण्याचे धोरण सातत्याने राबविले. विकास कामांचे गाजर दाखविले. प्रत्यक्षात कामेच केली नाहीत. त्यामुळे दिलेली आश्‍वासने हवेत विरली, असे स्पष्ट करीत या वक्त्यांनी सरकारच्या या योजनांमुळे सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले तर नाहीच, उलट नागरिकांच्या खिशास चोट बसली, असा आरोप काही नेतेमंडळींनी केला.
                आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या मतदारसंघात आपण तीसर्‍यांदा उभे आहोत, हॅट्रीक करण्याची संधी द्यावी या मतदारसंघाच्या विकासाकरीता आपण निश्‍चितपणे कटीबध्द राहु, कोणाच्याही विश्‍वासस तडा जावू देणार नाही, विकासातसुध्दा सातत्याने अग्रेसर राहु, प्रश्‍न सोडवू असा विश्‍वास व्यक्त केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या