🌟संविधान विरोधी शक्तीचा बिमोड करून महाआघाडीचे सरकार स्थापन करणे काळाची गरज - खा.चंद्रकांत हंडोरे


🌟नागपूर येथे भीमशक्ती आयोजित भरगच्च धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात ते बोलत होते🌟

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा कौल पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे, विधान सभेच्या निवडणुकीत भा. ज. प. व त्यांचे समर्थक वाटेल त्या थराला जाऊन महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संविधान बदलनार हे सूतोवाच करून राहुल गांधी यांनी लोकसभेत यशस्वी प्रचार केला तो धाधंत खोटा होता असा अपप्रचार महायुती करत आहे. वास्तविक राहुल गांधी यांनी केलेला प्रचार खरा होता म्हणूनच मोदी, शाह यांच्या आब की पार चार सौ पार नाऱ्याला मतदारांनी छेद दिला. येत्या निवडणुकीत हे अपमानाचे शल्य उराशी बाळगून पुनः एकदा संविधान बदलण्यासाठी भाजपा व मित्रपक्ष निवडणुका जिंकू पाहत आहेत. अशा वेळी संविधान प्रेमी जनतेने सरकारच्या फसव्या घोषणांना बळी पडून विचलित न होता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास मदत करावे असे आवाहन खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले. नागपूर येथे जवाहर वसतिगृह, सिव्हिल लाइन्स येथे भीमशक्ती आयोजित भरगच्च धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी वंचित आघाडीतील विद्ववत सभेतील असंख्य पदाधिकारी यांनी हंडोरे साहेबांच्या नेतृत्वात भीमशक्तीत प्रवेश केला.

यावेळी जेष्ठ नेते दिनकरदादा ओंकार, जनरल सेक्रेटरी मोहन माने, एन. डी.पिंपळे, कैलास सुखदाने, विदर्भ प्रदेश अध्यक्ष पंकज मेश्राम, पूर्व विदर्भ अध्यक्ष रोशन जांभूळकर, पश्चिम विदर्भ अध्यक्ष दिलीप भोजराज, हंसराज मेश्राम, शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष कैलास बोरकर, विजय मेश्राम, नरेन्द्र जैन, अविनाश भगत, अशोक वाकोडे, दिनेश कर्मलकर, संघदीप देवस्थळे, राजेश लोणारे,भूषण गायकवाड, मधुसूदन भटकर,प्रकाश देशपांडे, प्रतीक जाधव, रंजीत धोंगडे, गिरिधर मेश्राम, प्रिया जांभूळकर, सुधा जैन, नायांकला बोरकर, सुरेखा उंदिरवडे रामराव गाडेकर,अनिल मेश्राम,बाबा शंभरकर, मिलिंद खेरकर, अशया अन्सारी, माधुरी मडावी, रफिक भाई,मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे, संपर्क प्रमूख एन.के कांबळे, भाऊ सुरवाडे,राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, बाबा बनसोड, भाऊ साठे नगर, संतोष भिंगारे मराठवाडा अध्यक्ष, प्रेम चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजू मंजुळे, विनोद कोरके यांच्यासह सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या