🌟 दिक्षाभुमीत पुर्णेतील अनुयायी धोंडीराम गायकवाड व जनाबाई गायकवाड यांनीही घेतली बाबासाहेबांसोबत धम्म दिक्षा🌟
नागपूर :- नागपूर येथे दि.14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजया दशमी या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दिक्षा स्वतः घेवुन व आपल्या लाखो अनुयायी यांना हि देवून धर्मांतरण करण्याचे ठरविले. गावो गावी खेडो पाडी तांडा वस्ती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आणि पूर्णा तालुका येथील रेल्वेचे कर्मचारी धोंडीबा सहादू गायकवाड व त्यांची पत्नी जनाबाई गायकवाड यांच्या पर्यंत पोहोचली. धोंडीबा सहादु गायकवाड यांचे दोन मोठे भाऊ होते 1) रामजी गायकवाड 2) रेशमाजी गायकवाड आणि तिसऱ्या क्रमांकाचे हे धोंडीबा गायकवाड यांना 3 मुलं होती त्यांची नावं 1) विठ्ठल 2) रामजी 3) विजय आणि 4 मुली होत्या 1) भिवराबाई 2) कचरूबाई 3) सिंधूबाई 4) संगीता असे सात मुलं असणारं दांपत्य त्या काळी रेल्वे कार्टर येथे व नंतर (चांदमारी) आताचे सिद्धार्थ नगर येथे वास्तव्यास होते. धोंडीबा गायकवाड हे रेल्वे चे कर्मचारी असल्यामुळे त्यांचं काम ही रेल्वे स्थानकाच्या शेजारील कार्यालयातच होते. काही दिवसांपूर्वीच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पूर्णा या ठिकाणी येत असल्याची बातमी धोंडीबा गायकवाड यांना कळाली ते आपल्या पत्नी समवेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डोळे भरून पाहण्या करिता गेले व त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पाहायला मिळालं. आणि पाहता क्षणीच धोंडीबा जनाबाईनी हात जोडले.आता धोंडीबा गायकवाड यांना नागपूर येथे दिक्षा घेण्यासाठी जायचे ठरले. आपली मुलं भावाच्या घरी ठेवून हे दांपत्य पूर्णा रेल्वे स्थानकावरून नागपूर येथे जाण्यासाठी रवाना झाले.
लाखोंच्या गर्दीत हे दोघे प्रवास करीत होते धोंडीबा विचार करू लागले की आता महार जात टाकून देवून एक नवी जात आपण स्वीकारणार ते ही उच्च शिक्षित आपले बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत. हा नवा धम्म आपण अंगिकारला तर नक्कीच पुढं सारं काही चांगलच होणार आहे. बघता बघता अकोला स्थानक आलं आणि धोंडीबा आणि जनाबाई पदरात बांधलेली भाकर खावू लागले प्रवास पुढं करायचा या वर दोघात चर्चा झाली जेवण आटोपून ते दोघे नागपूर ला जाणाऱ्या रेल्वे मध्ये गर्दीत बसले. आणि नागपूर या ठिकाणी पोहोचले. पायी पायी चालत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आले लाखो लोक पाहून धोंडीबा म्हणाला जनाबाई ला बघ किती ही आपली जनता आज पाहायला भेटली ती बाबासाहेबांनी बोलवल्यामुळे नाहीतर आपले घर गावाबाहेर तेही माणसं मोजकी. इतकी गर्दी त्या दोघांनी जीवनात पहिल्यांदाच पाहिली आणि त्यांनी तिथं नावं नोंदणी केली त्यांचा क्रमांक 14840असा होता . त्यांना तो कागद देण्यात आला तो क्रमांक कागद ते निरखून पाहू लागले. तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं स्टेज कडे स्टेज वर डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ सविता आंबेडकर (कबीर) सपत्नीक बाबासाहेब उभे असलेले पाहून धोंडीबा जनाबाई यांनी दुरूनच हात जोडले दादासाहेब गायकवाड भंते चंद्रमनी आणि भिखू संघ बुद्ध मूर्ती असं सारं काही पाहिल्यावर त्या दोघांचं मन भरून आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर सपत्नीक बुद्ध मूर्तीची पूजा करीत होते आणि बुद्ध वंदना सुरू झाली.
बुद्धम शरणम् गच्छामी!
धम्मम शरणम् गच्छामी!
संघघ शरणम् गच्छामी!
दिक्षा देण्याचा कार्यक्रम पार पडला. या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायी यांना बावीस प्रतिज्ञा दिल्या धोंडीबा गायकवाड जनाबाई गायकवाड ते दोघे ही बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांच्या मागे म्हणू लागले कार्यक्रम संपला होता आणि आता हे दांपत्य परतीचा प्रवास करण्या करिता रेल्वे स्थानक नागपूर येथे आले रेल्वेत बसून सतत धोंडीबा जनाबाई उच्चार करू लागले. बुद्धम शरणम् गच्छामी!
धम्म शरणम् गच्छामी !
संघघ शरणम् गच्छामी!
जय भीम
मित्रांनो ही माहिती माझी आजी जनाबाई धोंडीबा गायकवाड यांच्या कडून अपेक्षा मला मिळाली मी लहान असताना. मी नेहमी विचारायचो माय तू बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिले काय त्यावर माय म्हणायची हो पाहिले की भूरा तार उंच होते बाबासाहेब आम्ही नागपूरला गेलो होतो दिक्षा घेयायला. त्याच माय नं सांगितलेला हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला कसा वाटला नक्की सांगा
धोंडीबा सहादू गायकवाड यांचा नातु
किरण विजय गायकवाड
रा. सिद्धार्थ नगर पूर्णा.
8788329304
1 टिप्पण्या
जय भीम.धन्यवाद अजित न्यूज.
उत्तर द्याहटवा