🌟 सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार जसपालसिंघ लांगरी यांची मागणी🌟
नांदेड :- सिख धर्मियांसह धन गुरसिखीवर अपार श्रद्धा असलेल्या तमाम जनतेची 'दक्षिण काशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सिख धर्माचे दहावे गुरु धन दसमपिता साहीब श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या चरणकमलांनी पावन झालेल्या हुजुर साहीब नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या कोट्यावधी रुपयांच्या जमीन संपत्तीवर भाडेकरारनमामा संपल्यानंतर देखील अनेकांनी बेकायदेशीर कब्जा केल्याचा तर काहींनी या संपत्ती बळकावण्यासाठी प्रयत्न चालवल्याचा गंभीर प्रकार समोर येत असतांना या अत्यंत गंभीर बाबीकडे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या सचखंड बोर्डाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे की आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहे ? असा प्रश्न गुरुद्वारा बोर्डाचे पुर्व सदस्य सरदार जसपालसिंघ लांगरी यांनी उपस्थित केला आहे.
नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कोट्यावधी रुपयांची जमीन सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सुविधेसाठी शासनाला श्री गुरु गोविंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटल करीता दिली होती सदरील परंतु शासनाने श्री गुरु गोविंदसिंघजी यांचे नाव बदलून शासकीय रुग्णालयाला देशाचे माजी गृहमंत्री स्व शंकराव चव्हाण यांचे नाव देऊन सदरील रुग्णालय विष्णुपुरी येथे स्थलांतरित केले याच पद्धतीने सचखंड गुरुद्वारा बोर्डाने आपल्या मालकीहक्काची कोट्यावधी रुपयांची जमीन उस्मानशाही मिलला देखील भाडेतत्त्वावर दिली होती या जमीनीची देखील लिजडीड संपलेली आहे याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील नांदेड महानगर पालिका लगत असलेली सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीहक्काची कोट्यावधी रुपयांची जमीन दुरसंचार विभागाच्या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर (लिजवर) देण्यात आली होती या जागे संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या बाजूने लागल्यानंतर देखील दुरसंचार विभाग जागा सोडण्यास तयार नाही आणि गुरुद्वारा बोर्ड जागा ताब्यात घेण्यास तयार नाही ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल याच प्रमाणे बाफना रोडवरील अनेक भाडेकरूंना भाडेतत्त्वावर दिलेल्या जमीनींसह सचखंड गुरुद्वारा बोर्डाने जुने बाफना मोटर्सला भाडेतत्त्वावर (लिजवर) दिलेल्या जागेवर बेकायदेशीर कब्जा जमवून दिपलक्ष्मी डेव्हलपर्सच्या वतीने हरिश्चंद्र इस्टेट नावाने बेकायदेशीर प्लॉट विक्री करून रहिवासी वसाहत विकसित केली जात असतांना सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासन मुग गिळून गप्प का ? असा प्रश्न सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य तथा जेष्ठ समाजसेवक सरदार जसपालसिंघ लांगरी यांनी उपस्थित केला असून पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीहक्काच्या सर्व जमीन संपत्ती सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे शासन नियुक्त प्रशासक सरदार विजय सतबीरसिंघ यांनी सक्तीने ताब्यात घेऊन त्या जमीन संपत्तींचा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह समाजहितासाठी वापरात घ्याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार जसपालसिंघ लांगरी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिला आहे........
0 टिप्पण्या