🌟पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर अपघातांची जिवघेणी मालिका : चालकाचा ताबा सुटल्याने कार कोसळली....!


🌟सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवित हाणी नाही : कार मधील चौघे बचावले बालबाल🌟 

पुर्णा (दि.१७ आक्टोंबर २०२४) :- पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर अपघातांची जिवघेणी मालिका थांबता थांबत नसून या मार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने सदरील मार्ग मृत्यूचा मार्ग म्हणून ओळखल्या जात असून पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील ताडकळस फाटा ते गौर नऱ्हापूर चुडावा परिसरात सातत्याने अपघात होतांना पाहावयास मिळत असून असाच एक हृदयविदारक अपघात आज गुरुवार दि.१७ आक्टोंबर रोजी सकाळी ०७.४५ ते ०८.०० वाफेच्या सुमारास घडला असून पुर्णेहून नांदेडच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली एम.एच.१४ एली ४८९३ क्रमांकाची कार गौर शिवारातील गोविंदपूर पाटीलगत चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईत कोसळून जबर अपघात झाला सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जिवित हाणी झाली नसली तरी कारचे मात्र बरेच नुकसान झाले आहे.

या अपघातात कार पलटल्याने कारमधील प्रवाश्यांना किरकोळ जखमा झाल्या असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्ताच्या कडेला जाऊन कोसळली यावेळी चालकाने वेळीच प्रसंगावधान राखण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील कारणे जवळपास दोन ते तीन पटल्या खाल्ल्या यावेळी अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही कारमधून प्रवास करणारे राज वाघमारे, नागेश वाघमारे सोबतचे दोघे जन या अपघातात किरकोळ जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन अपघातग्रस्ताना गाडी बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयातदाखल केल्याचे समजते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या