🌟परभणी पोलिस दलाकडून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सराईत गुन्हेगारां विरोधात धडक कारवाई सत्र...!


🌟जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार होणार आता जिल्ह्यातून हद्दपार🌟 

परभणी (दि.२२ आक्टोंबर २०२४) : महाराष्ट्र राज्यासह परभणी जिल्ह्यात होणाऱ्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईचे हत्यार उपसले असून याच कारवाईचा एक भाग म्हणून सोनूसिंग टाक नामक व्यक्तीस यंत्रणेने एक वर्षाकरीता परभणी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

               टाक यांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे दाखल आहेत त्यामुळेच त्यांच्या हद्दपारीसंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यावर उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी ठोस निर्णय घेवून सोनूसिंग पुनमसिंग टाक याला या जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपारीचा निर्णय घेतला सद्या हा आरोपी पाथरी पोलिस स्थानकात काही गुन्ह्यांमुळे अटकेत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या