🌟पुर्णा पंचायत समिती कार्यालयातील दलालांना आवर घाला....!


🌟सामाजिक कार्यकर्ते धनंजय देसाई यांची निवेदनाद्वारे पंचायत समिती गटविकास अधिकारी आंदीलवाड यांच्याकडे मागणी🌟 

पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा पंचायत समिती कार्यालयात दलालांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सरळ सरळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसून प्रत्येक योजनेतील लाभार्थ्यांना योजनांतील निधी प्राप्त करून घेण्यासाठी दलालांचा आधार घेणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पंचायत समिती कार्यालयातील दलालप्रथेला तात्काळ प्रतिबंध घालावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे पंचायत समिती गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदीलवाड यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी धनंजय देसाई यांनी आज सोमवार दि.०७ आक्टोंबर २०२४ रोजी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते धनंजय देसाई यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी आंदीलवाड यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की पंचायत समीतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी/ग्रामस्थांना शासकीय योजनांचा जो काही लाभ मिळतो तो केवळ रोजगार सेवकांच्या मार्फतच मिळावा किंवा लाभार्थी स्वतः आल्यास त्या लाभार्थ्याला सरळसरळ शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना दलाला मार्फत लाभ मिळवून देण्याची प्रथा तात्काळ बंद करुन पंचायत समिती कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट त्वरीत थांबवण्यात यावा असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी धनंजय देसाई यांची स्वाक्षरी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या