🌟सोयाबीन शेतमालाची आर्द्रता तपासणीसाठी खरेदी केंद्रावर येणाऱ्या सोयाबीनचे नमुने तात्काळ मॉईश्चर तपासून द्यावे🌟
परभणी (दि.30 आक्टोंबर 2024) : जिल्ह्यातील सर्व खरेदी संस्थांनी सोयाबीन शेतमालाची आर्द्रता तपासणीबाबत खरेदी केंद्रावर जे शेतकरी सोयाबीनचे नमुने घेऊन येतील त्यांना तात्काळ मॉईश्चर तपासून द्यावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.
गावोगावी आपले कर्मचारी पाठवून सोबत आर्द्रतामापक यंत्र नेऊन शेतकर्यांना प्रत्यक्ष सोयाबीन शेतमालाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात यावे. तसेच 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आद्रर्ता असलेला व एफएक्यु दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे, असे आवाहन शेतकरी बांधवांना करावे व सोबत माहितीपत्रकही वाटप करण्यात यावेत, असेही शेवाळे यांनी म्हटले आहे......
0 टिप्पण्या