🌟शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना.....!


🌟रविकांत तुपकरांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यास केले सूतोवाच🌟


 ✍️ मोहन चौकेकर      

बुलडाणा (दि.२२ आक्टोंबर २०२४) :- राज्यात शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी बिगर राजकीय सामाजिक संघटनेची स्थापना करीत 'क्रांतिकारी शेतकरी संघटनेची' घोषणा त्यांनी आज मंगळवार दि.२२ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे झालेल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. चळवळीचे अस्तित्व कायम ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडी सोबत बोलणे झाले असून महाविकास आघाडी कडून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा देखील देखील रविकांत तुपकर यांनी या बैठकीत व्यक्त केली.


            विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज २२ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. बुलडाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक पार पडली. या तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बैठकीत रविकांत तुपकर नेमकी काय भूमिका जाहीर करतात या याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर या मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी मोठा निर्णय घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तुपकरांना बाजूला केल्यानंतर शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी आपली वेगळी अशी स्वतंत्र संघटना असावी अशी मागणी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती त्यानुसार रविकांत तुपकरांनी सर्वांशी चर्चा करून स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर रविकांत तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची घोषणा आज बुलढाण्यात झालेल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली रविकांत तुपकरांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले 'क्रांतिकारी शेतकरी संघटना' आता राज्यभर अधिक व्यापक पद्धतीने काम करणार आहे. ही संघटना केवळ शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित राहणार नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी ही संघटना काम करणार आहे. बिगर राजकीय सामाजिक संघटना म्हणून ही संघटना राज्यभरात आक्रमकपणे काम करेल असेही तुपकर यांनी यावेळी सांगितले.


       सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आपल्यासमोर सध्या ४ पर्याय आहे. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, दुसरा महायुतीचा, तिसरा वंचित बहुजन आघाडीचा आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे आहे.  त्यावर काय करायचे..? तुमच्या मनात काय आहे, असे विचारताच महाविकास आघाडीसोबत जाण्यास प्राधान्य द्यावे जर ते सकारात्मक झाले नाही तर सर्व पर्याय आपल्यासमोर खुले आहेत, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान आपली महाविकास आघाडी सोबत सकारात्मक चर्चा सुरू असून महाविकास आघाडी कडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे देखील रविकांत तुपकरांनी यावेळी सांगितले. "क्रांतिकारी शेतकरी संघटना" म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील, निवडणूक कोणत्या सिम्बॉलवर लढवायची हे ठरवू, या संदर्भात आपली १० जणांची कोअर कमिटी निर्णय घेईल. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय होणार आहे त्यामुळे ताकदीने कामाला लागा, असा सूचक इशाराही रविकांत तुपकर यावेळी यांनी दिला. दोन दिवसात अधिकृतपणे निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने तयार रहा असेही शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सांगितले......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या