🌟नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या जमिनीवरील दिप लक्ष्मी डेव्हलपर्सचे हरिश्चंद्र इस्टेटचे काम तात्काळ थांबवा.....!


🌟अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी केली आहे🌟


नांदेड (दि.१६ आक्टोंबर २०२४) - नांदेड शहरातील जुने बाफना मोटर्सच्या जागेवर गुरुद्वारा बोर्डाच्या लिजवर घेतलेल्या जागेवर दिपलक्ष्मी डेव्हलपर्स हे हरिश्चंद्र इस्टेट नावाने बेकायदेशीर प्लॉट विक्री करून रहिवासी वसाहत विकसित केली जात आहे. ते अनधिकृत असल्याने तात्काळ काम थांबवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी केली आहे.


     सचखंड गुरुद्वारा बोर्डाची बाफना परिसरामध्ये सर्वे क्र - 86 ची जमीन लिजतत्त्वावर देण्यात आली होती. या लिजवर दिलेल्या जमिन भाडेकरूंनी परस्पर खोटी कागदपत्रे सादर करून मालकी प्रमाणपत्र मिळवली आहेत. या मालकी प्रमाणपत्राच्या आधारे दीपलक्ष्मी डेव्हलपर्सकडून हरिश्चंद्र इस्टेट नावाने प्लॉटिंग पाडून श्रीमंतांची कॉलनी निर्माण करण्यात येत आहे. सदर जमीन गुरुद्वारा बोर्डाच्या मालकी व हक्काची असल्याने अतिक्रमण काढून बोर्डाला सुपूर्त करण्याबाबत करीमनगरचे मनजीतसिंघ जगनसिंघ यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका क्र - 7345 /2023 प्रलंबित आहे.

     सदर याचिकेचा निकाल लागेपर्यंत जमिनीवरील प्लॉटची खरेदी -विक्रीखत अथवा पी. आर कार्ट नोंदणी तसेच सुरू असलेली विकासकाची कामे थांबवून सदर जमीन जशी आहे तशीच ठेवणे व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या