🌟या शिबिरासाठी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ पैठणे यांनी जिल्हा शिबिराचे योग्य मार्गदर्शन केले🌟
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष ग्रह/विधी व न्याय विभागामार्फत जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले असून जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ पैठणे यांनी पूर्णा येथील रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय धर्मादाय रुग्णालय यांचे पाथरी व जिंतूर तालुक्यातील खेडेगावात व पूर्णा तालुक्यातील खेडेगावात शिबिरांच्या आयोजन करून देण्यात आले असून पाथरी मधील गौंडगाव जिंतूर तालुक्यातील वरुड, माणकेश्वर, निवळी, पिंपळगाव,मठाळा, मुडा, बालखेडा, हंडी, कोठा इत्यादी गावांचा समावेश असून पूर्णा तालुक्यातील बारा गावे आहेत
या शिबिरासाठी श्री.बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भाई गोळेगावकर यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले त्याचबरोबर कॉलेजचे प्राचार्य डॉ.गोविंद लंगोटे प्रशासकीय अधिकारी अभय कुमार कदम यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर सचिन लोणे, डॉक्टर सूर्यकांत काळे व कर्मचारी नर्स, महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुढील शिबिराचे नियोजन योग्यरीत्या पार पाडत आहेत या शिबिरासाठी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ पैठणे यांनी जिल्हा शिबिराचे योग्य मार्गदर्शन केले.....
0 टिप्पण्या