🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या मुख्य रस्त्यांवरील 'खड्डे बुजाव मोहिमेचे' अवघ्या दहा दिवसांत पित्तळ उघडे....!


🌟मुख्य रस्त्यांची अवस्था एकाच पावसामुळं पुन्हा जशास तशी ? शहराच्या विकासाला पोखरताय भ्रष्ट नौकरशाहरुपी घुसी🌟


"मुक्काम पोस्ट पुर्णा जंक्शन"

पुर्णा (विशेष वृत्त) :- 'पुर्णा शहर तसे भलतेच चांगले पण् बेईमान पुढारी अन् भ्रष्ट नौकरशहांनी वेशीवर टांगले' अशी एकंदर अवस्था पुर्णा शहराची झाल्याचे पाहावयास मिळत असून पुर्णा नगर परिषदेंतर्गत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांसह शहरातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करण्याऐवजी प्रशासकांच्या कचाट्यात अडकलेल्या नगर परिषद प्रशाकीय व्यवस्थेने सदरील कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकानिधीचा वापर अनावश्यक निर्मनुष्य परिसरात केल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यांची अंत्यंत दयनीय झाल्याचे निदर्शनास येत असून रस्त्यांवर 'खड्डे की खड्ड्यांवर रस्ते' असा प्रश्न जनसामान्यांत उपस्थित होत असून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराला जोडणाऱ्या सम्राट अशोक रोड-स्वामी दयानंद सरस्वती चौक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा बसवेश्वर चौक,महात्मा बसवेश्वर चौक ते महाविर नगर, महात्मा बसवेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत नरहरी महाराज चौक शहिद भगतसिंघ चौक छत्रपती शिवाजी महाराज नगर (मराठगल्ली), लोकमान्य टिळक रोड या प्रमुख रस्त्यांची झालेली दुरावस्था नगर परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढतांना पहावयास मिळत आहे.


पुर्णा नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी जिवराज डाफकर यांच्या आदेशानुसार तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे व नगर अभियंता अब्दुल हकीम यांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वी विजयादशमी (दसरा) व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून हजारों रुपयांची धुळधाण करीत दि.०९ आक्टोंबर २०२४ रोजी रात्री मोठ्या कॉंक्रेट मिक्सर मशीनच्या साहाय्याने अक्षरशः महापराक्रम गाजवल्यागत 'खड्डे बुजाव मोहिम' राबवत शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,जामा मस्जिद परिसर,नगर परिषद परिसर,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्वामी दयानंद सरस्वती चौक,रेल्वे स्थानक परिसर,बसस्थानक रोडवरील खड्ड्यांमध्ये अक्षरशः कुत्र ओकल्यागत थातुरमातुर सिमेंट/खडी/डस्टचा कालवण टाकून खड्डे बुजवण्याचे लोकनाट्य रंगवले परंतु अवघ्या चोवीस/छत्तीस तासांतच या खड्डे बुजाव नाट्याचा फज्जा उडण्यास सुरुवात झाली आणि पहाता पहाता अवघ्या दहाव्या दिवशी काल शनिवार दि.१८ आक्टोंबर ते १९ आक्टोंबर रोजी मध्यरात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावरील मोठमोठी भोकाड उघडी पडली त्यामुळे 'एकाच पावसात मुख्य रस्त्यांची अवस्था पुन्हा जशास तशी अन् पुर्णा शहराच्या विकासाला पोखरताय भ्रष्ट नौकरशाहरुपी घुसी' असे म्हणण्याची वेळ पुर्णा शहरातील नागरिकांवर आली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या