🌟राज्यपाल नियुक्त सात विधान परिषद सदस्यांमध्ये हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचा देखील समावेश🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतांनाच आज मंगळवार दि.१५ आक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी विधान परिषदेसाठी सात सदस्यांच्या निवडीची घोषणा केली सदरील राज्यपाल नियुक्त सात सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी आज दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात शपथ दिली
मागील जवळपास अडीच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा भरण्यासाठी हालचालींना वेग आला होता. तथापी १२ ऐवजी केवळ ७ नावांची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती चित्रा किशोर वाघ,श्री विक्रांत पाटील,श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड या तीन सदस्यांचा तर शिवसेना शिंदे गटाच्या श्री हेमंत पाटील,डॉ श्रीमती मनीषा कायंदे या दोन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या श्री पंकज छगन भुजबळ,श्री इद्रिस इलियास नाईकवाडी या प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे....
0 टिप्पण्या