🌟परभणी-गंगाखेडच्या मांडलीकत्वाच्या कचाट्यात कायम अडकलेल्या पुर्णा तालुक्याच्या प्रगतीला लागली कायमची खिळ....!


🌟परभणी जिल्ह्यात कधीकाळी सर्वात प्रगतशील असलेल्या पुर्णा तालुक्याच्या अधोगतीला जवाबदार कोण ?🌟 


✍🏻परखड सत्य - चौधरी दिनेश (रणजित)

परभणी जिल्ह्यात सौभाग्याने पुर्णा गोदावरी नद्यांचे वरदान लाभल्याने कृषी क्षेत्र/औद्योगिक क्षेत्र/व्यापार क्षेत्र/गौण खनिज वाळू/मुरुम/दगड खडी आदीं मिळणाऱ्या महसुली क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात देखील सर्वात आघाडीवर असलेला एकमेव सधन तालुका म्हणून जवळपास साडेतीन दशकांपूर्वी स्वतःचे एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या पुर्णा तालुक्यावर परभणी जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील नांदेड जिल्ह्यातल्या देखील संधीसाधू तत्वभ्रष्ट पुढाऱ्यांसह दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील परप्रांतीय मराठीव्देष्ट्या नौकरशहांची देखील वक्रदृष्टी पडल्याने पाहता पाहता या प्रगतशील पुर्णा तालुक्याची संपूर्णतः वाट लागल्याचे निदर्शनास येत असून सन २००८ पुर्वी परभणी लोकसभेसह परभणी विधानसभा मतदारसंघात असलेल्या पुर्णा तालुक्याचा सन २००८ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला परभणी विधानसभा मतदार संघातून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात समावेश झाल्यानंतर पुर्णा तालुक्याच्या वेठविगारीला कुठेतरी लगाम लागेल व पुन्हा या तालुक्याच्या प्रगतीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु यानंतर देखील पुर्णेकरांच्या अपेक्षा भंग झाल्या आणि सन २००८ पुर्वी परभणीच्या पुढाऱ्यांचे मांडलीकत्व स्विकारेल्या पुर्णेकरांवर सन २००८ नंतर मात्र गंगाखेडच्या पुढाऱ्यांचे मांडलीकत्व स्विकारण्याची वेळ आली ही निश्चितच शोकांतिका म्हणावी लागेल.

परभणी जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुर्णा तालुक्यातील जनतेवर स्वतःचाच तालुक्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतांना पाहण्याची वेळ शेवटी कोणामुळे आली यावर देखील विचार करण्याची आवश्यकता आहे निवडणूक काळात पुर्णा तालुक्यातील मतदानावर व निवडणूक संपल्यानंतर तालुक्यातील नगर परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायतांच्या माध्यमातून मर्जीतील भ्रष्ट गुत्तेदार टोळ्यांना हाताशी धरुन बोगस विकासकामांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांवर,तस्कर/माफियांच्या टोळ्यांना पाठबळ देऊन पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील गौण खनिज वाळूचे प्रचंड प्रमाणात उत्खनन करून या चोरट्या वाळूच्या तस्करीतून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या वरकमाईवर,शासकीय खाजगी भुखंडांवर डोळा ठेवणाऱ्या तत्वभ्रष्ट पुढाऱ्यांनी पुर्णा तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या विकासावर,उद्योग कारखाने निर्मितीवर कदाचित भर दिला असता तर तालुक्यात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन तालुक्यातील तरुण पिढी गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळली नसती परंतु 'काम सरो वैद्य मरों' या प्रवृत्तीच्या तत्वभ्रष्ट पुढाऱ्यांनी प्रगतशील पुर्णा तालुक्याच्या प्रगतीला कायमची टाच लावून पुर्णा तालुक्याची कायमचीच वाट लावली असे म्हणणें चुकीचे ठरणार नाही कारण निजाम/इंग्रज काळापासून भौगोलिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे रेल्वे जंक्शन स्थानक असलेल्या पुर्णा जंक्शन स्थानकावरील अनेक महत्त्वाची रेल्वे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित होत असतांना परभणी लोकसभा मतदारसंघासह गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनमतातून निवडून येणाऱ्या एकाही पुढाऱ्यांनी या स्थलांतराला लोकसभा/विधानसभा सदणात आवाज उठवून प्रखर विरोध केला नाही.

परभणी विधानसभा मतदारसंघातून पुर्णा तालुक्याचा समावेश गंगाखेड विधानसभा मतदारसंघात झाल्यानंतर या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व पुर्णा तालुक्याकडे येईल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु मुंबई/परभणी/गंगाखेड येथील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या स्थानिक पुढारी स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यात सातत्याने अपयशी ठरल्यामुळे याचा पुरेपूर फायदा प्रस्थापितांनी घेऊन या पुर्णा तालुक्याची सोयीस्कररित्या वाट लावण्याचेच काम केले महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची भारत निवडणूक आयोगाने नुकतीच घोषणा केली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून मागील सन २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कारागृहातून उमेदवारी अर्ज भरुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून निवडून आलेले विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे व याच निवडणूकीत द्वितीय क्रमांकावर राहिलेले पुर्णा तालुक्याचे भुमिपुत्र शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विशाल कदम व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे तब्बल दोन वेळेस आमदारपद उपभोगलेले माजी आमदार सिताराम घनदाट यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उच्चशिक्षित जिल्हाप्रमुख रुपेश मनोहरराव सोनटक्के,अनाम महिला मंडळ अध्यक्षा शिरीन बेगम मोहम्मद शफीक या देखील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाकडून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अजून एकाही पक्षाने उमेदवारीची घोषणा केली नसली तरी देखील सदरील नावे सद्या जोरदार चर्चेत असून मागील निवडणूकांचा इतिहास पाहता जात/पंथ/धर्म आणि पक्ष तत्वांना यत्किंचितही महत्व न देता वेळोवेळी लक्ष्मीअस्त्रांला बळी ठरलेला हा गंगाखेड विधानसभा मतदारसंघ यावेळी मात्र कोणत्या मार्गावर जातो हे तर येणारा काळच सांगेल दरम्यान याहीवेळी गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा तालुक्याला पुन्हा एकदा गंगाखेडचेच मांडलीकत्व स्विकारण्याची वेळ येते की काय ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या