🌟तथागत भगवान बुद्धांची मंगल मैत्री भावना जगाला दिशादर्शक....!


🌟श्रीलंका येथील मा.खासदार भदंत अतू रलिय रतन महाथेरो यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.१८ आक्टोंबर २०२४) - पुर्णा येथील बुद्ध विहारात अश्विन पौर्णिमा वर्षावास समारोप संघदान धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व पूज्य भदंत पय्या वंश यांच्या संयोजनाखाली दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाला. 


सकाळी साडेपाच वाजता बुद्ध विहारांमध्ये परीत्रान पाठ सूक्त पठन श्रीलंका येथील मा . खासदार पूज्य भदंत आतुरलीय रतन महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आले यावेळी पूजनीय भिक्कु संघ यांचे विशेष उपस्थिती होती पूर्णा शहरातील धम्म सेवेत करत असलेली महिला मंडळ श्रद्धा संपन्न उपासक उपासिका मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होते. 

यावेळी पूज्य भदंत अतुरलिय रतन थेरो यांनी बुद्ध वचन ग्रहण करत असताना विपश्यना कशी करावी हे त्यांनी स्वतः हरण स्पष्ट करून दाखविले उपासक उपासिकांकडून त्यांनी करून घेतले. सकाळी 11 ते दुपारी 12:30 दरम्यान पूजनीय भिक्खू संघासह उपस्थिताना भोजनदान सुप्रसिद्ध उद्योजक आदर्श धम्म उपासक संदीप ढगे यांच्याकडून देण्यात आले मुख्य कार्यक्रमाला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात झाली पूजनीय भिकू संघ ज्यामध्ये मराठवाड्या मधून महाराष्ट्र मधून आलेल्या भिक्कु गणांचा समावेश होता.भदंत पयारत्न थेरो,भजंतपैया बोधिथेरो,भदंत धम्मशील थेरो,भदंत सुभती थेरो,भदंत बोधिधम्मा भदंतशील रत्न भदंत पयाजित आदीसह अनेक भिकू गन श्रामणेर  उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव विकास कदम नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अनंत सूर्यवंशी फिनिक्स हॉस्पिटल नांदेड तद्वतच नांदेड जिल्हा कोषागार अधिकारी बौद्ध धम्माच्या अभ्यासिका ज्योतीताई बगाटे यांची उपस्थिती होती आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये श्रीलंका येथील चार वेळा खासदार राहिलेले येथील पंतप्रधानाचे धार्मिक सल्लागार पूज्य भदंत आतुरलीय रतन आतुरलीय रतन महादेव यांनी आपल्या प्रदीर्घ अभ्यासपूर्ण धम्मदेशनेमध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाची महती विशद करताना सांगितले संपूर्ण जगाला मानव जातीला तथागत भगवान बुद्धाच्या मंगल मैत्रीची नितांत आवश्यकता आहे. त्यामधून जगाचे व प्राणीमात्राचे कल्याण होणार आहे. 

त्यांनी श्रीलंकन सिंहली भाषेमधून धम्मदेशना दिली त्यांच्या भाषणाचा अनुवाद श्रीलंका या ठिकाणी काही वर्ष राहून धम्माचे तत्त्वज्ञान अवगत केले सीहली भाषा शिकली असे विपश्यनाचार्य पयारत्न थे रो यांनी केले महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे अवर सचिव विकास कदम यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्या पद्धतीने आचरण अपेक्षित आहे जिल्हा कोषागार अधिकारी व बुद्धतत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका विशुद्ध आचारवंत ज्योतीताई बगाटे यांनी बुद्ध धम्माची महती विशद केली धम्मा मधून आपणाला शाश्वत समाधान व सुख मिळत असते अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वर्षावास समारोप संघदान याविषयी ऐतिहासिक माहिती दिली. त्यांचा 44 वा वर्षावास अखंडपणे धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याविषयी माहिती सांगितली प्रमुख उपस्थिता मध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष  गटनेते उत्तम भैया खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक मधुकर गायकवाड एडवोकेट धम्मा जोंधळे ज्येष्ठ समाजसेवक देवराव खंदारे माजी नगरसेवक अशोक धबाले नगरसेवक मुकुंद भोळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड कॉम्रेड अशोक व्ही कांबळे  पत्रकार विजय बगाटे बौद्धाचार्य तुकाराम ढगे ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे टी झेड कांबळे शिवाजी थोरात विजय जोंधळे गौतम काळे विजय गायकवाड विनोद कनकुटे गौतम वाघमारे एम यु खंदारे बाबाराव वाघमारे ज्ञानोबा जोंधळे श्रावण येंगडे शाहीर गौतम कांबळे आदींची उपस्थिती होती. 

शाहीर विजय सातोरे यांनी स्वागत गीत सादर केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर ढाकर गे राहुल धबाले राम भालेराव राजू जोंधळे सुरज जोंधळे सोनू काळे व भारतीय बौद्ध महासभा वीहार समिती धम्म सेवेत कार्यरत असलेले महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप झाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या