🌟अमरावती शहरातील धम्म प्रचारक डॉक्टर मंगेश देशमुख यांचा हृदयस्पर्शी निर्णय....!


🌟डॉ.देशमुख यांनी आपल्या सासरे यांचे दसव किंवा तेरवी न करता निराधार बेघर लोकांना केले अन्नदान🌟  

धम्म प्रचारक डॉक्टर मंगेश देशमुख यांनी आपले सासरे यांचा दसव किंवा तेरवी न करण्याचा निर्णय घेऊन अमरावती शहरातील शहरातील निराधार बेघर लोकांना अन्नदान केले.

याप्रसंगी त्यांनी कुठल्याही नातेवाईकांना निमंत्रण दिले नाही. कालथीत केशवराव विश्वासराव देशमुख यांची पत्नी पुष्पलता देशमुख, मुलगी प्रतिमा देशमुख, मुलगा संतोष देशमुख, त्यांचे लहान बंधू श्याम देशमुख, त्यांचे जावई डॉक्टर मंगेश देशमुख, त्यांचे दुसरे जावई श्रीमान अनिलराव देशमुख, प्रा. गंगाधर नाखले उपस्थित होते. 

या श्रद्धांजलीच्या प्रसंगी श्याम देशमुख, सौ प्रतिमा देशमुख, श्रीमान अनिलराव देशमुख, प्रा. गंगाधर नाखले यांनी आपले विचार व्यक्त केले.संस्थेचे प्रमुख संजय बसवनाते, यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका ज्योती राठोड यांनी या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. 

या संस्थेमध्ये संपूर्ण निराधार बेघर लोक असतात यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या राहण्याची त्यांच्या अंघोळीची त्यांच्या झोपण्याची सर्व व्यवस्था तिथे अतिशय उत्तमपणे केल्या जाते ज्यांना कुणाला अन्नदान करायचे असेल त्यांनी येथे येऊन अन्नदान केल्यास खरोखर ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना अन्न मिळते. 

प्रा. गंगाधर नाखले

04/10/2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या