🌟महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची चक्क लॉरेन्स बिश्नोईला ऑफर....!


🌟उत्तर भारतीय विकास सेनेने वांद्रे पूर्व विधानसभेतून झिशान सिद्दिकीं विरोधात निवडणूक लढवण्याची दिली ऑफर🌟


पंजाबी गायक सिध्दू मुसेवालासह नुकतीच हत्या झालेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा आरोप असलेला लॉरेन्स बिश्नोई याने मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र तथा वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार झिशान सिद्दिकींयांच्या विरोधात निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवावी अशी ऑफर उत्तर भारतीय विकास सेनेने दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी एका पत्राद्वारे गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला दिल्याने महाराष्ट्र राज्यातील राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजली आहे महाराष्ट्र राजकीय क्षेत्रात लॉरेन्स बिश्नोई आता पदार्पण करतो की काय ? अशी खळबळजनक चर्चा सुरू झाली असून लॉरेन्स बिश्नोई याला आता चक्क महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची ऑफर उत्तर भारतीय विकास सेना या निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत असलेल्या पक्षाने पक्षाच्या लेटरहेडवर दिल्याने संपूर्ण राजकीय क्षेत्रात गोंधळ माजला आहे.

मुंबईतील मयत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचा गढ समजल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तथा बाबा सिद्दिकींचे सुपुत्र झिशान सिद्दीकी विरोधात निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला थेट ऑफर देण्यात आली आहे बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या काही शार्पशूटरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काळे हरीण मारल्याचा बदला घेण्यासाठी जीवे मारण्याच्या लॉरेन्स बिश्नोई कडून अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील एका प्रकल्पातील जवळपास ६२३ गरीब लोकांना बेघर केल्याचा आरोप उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी केला असून या संदर्भात कोर्टात रिट पिटीशन देखील दाखल करण्यात आल्याचे म्हटले असून उत्तर भारतीय विकास सेनेकडून गुजरात राज्यातील साबरमती कारागृह प्रशासनाला निवेदन लिहून मागणी करण्यात आली आहे उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला पूर्ण पाठिंबा असल्याचे देखील म्हटले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या