🌟कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केले होते🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे आज तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार श्री.विजयराव भांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.
भव्य दिव्य बुद्ध मूर्ती स्थापना कार्यक्रमाच्या सुरुवातीस पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, पु.भदंत डॉ.इंद्रवंश ( उ.प्र.), पु.भंते पयारखीत (पुणे), पूज्य भंते मुदितानंद (परभणी), पूज्य भन्ते सुगत बोधी (नांदेड) यांनी उपस्थित राहून बौद्ध बांधवांना धम्मवंदना दिली. उपस्थित मान्यवरांचा हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या थायलंड येथून उपलब्ध भव्य दिव्य बुद्ध मूर्तीचे स्थापना कार्यक्रम पार पडला. यावेळी मा.डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांनी जमलेल्या बौद्ध बांधवांना धम्म संवाद साधत सर्वांना भारत देश बौद्धमय निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. आयोजकांनी मा.डॉ.सिद्धार्थजी यांचे उपस्थित राहिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार व आदरतिथ्य केले. त्याबद्दल त्यांनी आभार मानले. कार्यक्रमास सोबत युवती नेत्या प्रेक्षा विजयराव भांबळे, माजी सभापती रामराव उबाळे, आशिष वाकोडे, लखन धाडवे, बंटी निकाळजे, पत्रकार मंचक खंदारे, संभाजी खिल्लारे, सावित्रीबाई फुले महिला मंडळ पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या