🌟यावेळी प्रसिध्दीप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिजित पगारे यांचा आ.संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟
संभाजीनगर : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी अभिजीत पगारे यांची शिवसेना प्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे . या वेळी अभिजित पगारे यांचा आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विकास जैन, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ महीला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, प्रा. संतोष बोर्ड, शहर संघटक संतोष मरमट, युगंधर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदा शिरसाट, महीला आघाडी जिल्हा संघटक शिल्पा राणी वाडकर,उपशहर प्रमुख राजू राजपूत , निखील तिवारी, स्नेहल अब्बड, रखमजी जाधव , पी. आर . ओ मनोज वडगावकर आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या