🌟मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक : मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा...!


🌟संत महापुरुषांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती🌟


नांदेड (दि.16 ऑक्टोबर 2024) : ऐतिहासिक गुरुद्वारा मातासाहेब मुगट येथे मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या मातासाहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता भव्य नगरकीर्तन कार्यक्रमाने झाली. बुधवार, दि. 16 रोजी सकाळी 9 वाजता कीर्तन दरबार व दिवान कार्यक्रमास सुरुवात झाली. समापन कार्यक्रमात तख्त सचखंड श्री हजुरसाहेबचे मित जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मित ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा तेजासिंघजी जत्थेदार मातासाहेब यांची प्रमुख उपस्थितीती होती. 

आज कीर्तन दरबार मध्ये भाई बलविंदरसिंघ रंगीला, भाई पिंदरसिंघजी रागी जत्था यांचे शबदगायन झाले. श्री आनंदसाहेबचे पाठ आणी श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचा हुकुमनामा वाचण्यात आला. तसेच कार्यक्रम समापन अरदास करण्यात आली. यावेळी शिरोमणि अकाली बुड्ढा दल 96 करोडी तसेच निहंग सिंघ दलांचे स्थानीक प्रमुख आणी निहंगसिंघ जत्थेबंदी उपस्थित होते. 


दुपारी 3 वाजता सुमारास गुरुद्वारा मातासाहेब येथून भव्य नगरकीर्तन यात्रेस प्रारंभ झाली. नगरकीर्तन यात्रेत निशानसाहेब, घोडे, कीर्तन जत्थे, गतका जत्थे, निहंगसिंघ दल आणी भाविकांची उपस्थिती होती. नगरकीर्तन यात्रा माता साहेब मुगट येथून, हीराघाट ब्राह्मणवाडा, त्रिकूट, गडेगाव, मालटेकडी, नमस्कार चौक, नंदिग्राम सोसायटी, बाफना, भगतसिंघ रोड येथून गेट नंबर एक गुरुद्वारा येथे पोहचली. रस्त्यात भाविकांनी जागोजागी नगरकीर्तन यात्रेची आरती ओवाळळीे. ठिकठिकाणी शरबत, चने आणी प्रसाद वाटप करण्यात आले. तखत सचखंड येथे पोहचून रात्री उशिरा यात्रेचा समारोप झाला. गुरुद्वारा मातासाहेब देवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरमीतसिंघ बेदी, राजसिंघ रामगडिया, गुलाबसिंघ असर्जनवाले, अडवोकेट सुरेंदरसिंघ लोनीवाले व सेवकांनी प्रयत्न केले. तीन दिवसीय आयोजनात पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, मुदखेड नगर परिषद, पंचायत समेती यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले......

.............

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या