🌟पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फुटले नारळ🌟
गंगाखेड : २४ वर्षांची परंपरा असलेला श्री साई सेवा प्रतिष्ठानचा दसरा महोत्सव या वर्षीही उत्साहात साजरा होणार आहे. सर्वसामान्यांचे आकर्षण असलेल्या आतिषबाजीसह ५१ फुटी अपप्रवृत्ती पुतळा निर्मितीसह इतर कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे.
जेष्ठ व्यापारी तथा आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे अनिल यानपल्लेवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी, बाजार समिती संचालक सुशांत चौधरी, कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, अभियंता तथा प्रतिष्ठानचे सचिव नागेश पैठणकर आदिंच्या हस्ते पुजन करून महोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ करण्यात आला. हिंगोली येथील विठ्ठल भुसांडे व त्यांच्या सहकारी कलाकारांनी पुतळा बनवण्याचे काम हाती घेतले असून आतिषबाजीसाठी बीड येथील रफिकभाई आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. तर गंगाखेड येथील प्रिभूषण कला अकादमी, स्टार डान्स अकादमीच्या सांस्कृतिक कलाकारांनीही आपली कला सादर करण्याची तयारी पुर्ण केली आहे.
स्मशानभूमी परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, नागेश पैठणकर, रमेश औसेकर, नंदकुमार भरड, हरीभाऊ सावरे, मनोज नाव्हेकर, जुगलसेठ तोतला, गजानन महाजन, कल्याण तुपकर, संजय अनावडे, राजेंद्र पाठक, बालासाहेब यादव, भगत सुरवसे, गंगाराम मामा मसनजोगी, वजीरभाई, कुणाल यानपल्लेवार, राजेश जवादे, अनंतकुमार मुंडे, सुहास देशमाने, बाळासाहेब सोनटक्के, व्यंकटेश यादव, यलाप्पा शंकुवार आदिंसह प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.......
0 टिप्पण्या