🌟परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी 12 हजार 568 कर्मचार्‍यांची फौज....!



🌟निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना पोस्टल मतदानाची सुविधा🌟

परभणी (दि.19 नोव्हेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांतर्गत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी या दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर 12 हजार 568 अधिकारी-कर्मचार्‍यांची फौज तैनात केली आहे.

             जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून संपूर्ण निवडणूकीचा तपशील जाहीर केला. त्याप्रमाणे परभणी, जिंतूर, पाथरी व गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघात 171 क्षेत्रीय अधिकारी, 550 विविध पथकांमध्ये अधिकारी व कर्मचारी, तसेच मतदान केंद्रांवर 12 हजार 568 मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांना पोस्टल मतदानाची सुविधाही पुरविण्यात आली आहे विधानसभा निहाय मनुष्यबळाची उपलब्धता पुढील प्रमाणे :-

             जिंतूर मतदारसंघात 438 केंद्रांवर 482 केंद्राध्यक्ष,482 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 1, 482 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 2 व 482 इतर मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परभणी मतदारसंघात 338 केंद्रांवर 372 केंद्राध्यक्ष, 372 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 1, 372 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 2 व 372 इतर मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गंगाखेड मतदारसंघात 432 केंद्रांवर 476 केंद्राध्यक्ष, 476 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 1, 476 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 2 व 476 इतर मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पाथरी मतदारसंघात 415 केंद्रांवर 457 केंद्राध्यक्ष, 457 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 1, 457 मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 2 व 457 इतर मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या