🌟विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी शेतकर्‍याकडून 15 हजारांची लाच : लाच प्रकरणातील दोघांना पोलिस कोठडी....!


🌟न्यायालयाने सूनावली एक दिवसाची पोलिस कोठडी🌟

परभणी (दि.27 नोव्हेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी शेतकर्‍याकडून 15 हजार रुपयांची लाच स्विकारल्याच्या प्रकरणातील दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सूनावली आहे.

              मानवत तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या शेतातील विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने संबंधिताकडे 20 हजाराची लाच मागून तडजोडीअंती मंगळवारी (दि.26) कंत्राटी तंत्रज्ञामार्फत 15 हजार रूपये स्विकारल्याने त्या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली.  बुधवारी (दि.27) या गुन्ह्यातील दोन्ही अटक आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने तपासकामी एक दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. आरोपींमध्ये कनिष्ठ अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत ( महावितरण ग्रामीण शाखा 1 मानवत रा.आलमगीर कॉलोनी, परभणी) आणि कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरुद्र कोल्हेकर (महावितरण ग्रामीण शाखा 1 मानवत रा.मानवत) यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या