🌟सेवानिवृत्त मुख्याध्यापका जवळील 16 ग्राम सोन्याची चैन व 2 अंगठ्या मिळून अंदाजे 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल पळवला🌟
फुलचंद भगत
वाशिम :- तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची दोन लाख 40 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी स्थानिक अकोला रोडवर घडली आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीधर बबनराव इंगोले वय 68 राहणार मंगरूळपीर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की फिर्यादी श्रीधर बबनराव इंगोले मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मंदिरामध्ये जाण्यासाठी घरातून एकटे निघाले असता मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत जात असताना अकोला बायपासला कविराज वाईन बार समोर एक व्यक्ती दुचाकी घेऊन आली व त्या व्यक्तीने फिर्यादीला पोलीस अधिकारी म्हणून तपासणी पथक नेमले असल्याचे सांगितले व त्याने व त्याच्या साथीदाराने त्याच्या जवळील 16 ग्राम सोन्याची चैन व दोन अंगठ्या मिळून अंदाजे दोन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन मंगरूळपीर येथे फसवणूक केली आहे.
फिर्यादीच्या अशा आशयाच्या जबांनी रिपोर्टर वरून मंगरूळपिर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे......
0 टिप्पण्या