🌟मतदानाच्या वेळी बोटाला लावली जाणारी निळी शाई...कोठे तयार होते ?


🌟जाणुन घेऊ या इतिहास ; जगातील 90 टक्के देश आहेत भारतावर अबलंबून🌟 

✍️ मोहन चौकेकर 

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे दिवस आहेत. येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. याच मतदानाच्या गदारोळात एक विषय सर्वांच्या ओत्सुक्याचा आहे. तो म्हणजे, बोटाला लावली जाणारी शाई. कारण अनेकजण मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या बोटाशी शाई दाखवत. लोकशाहीचं आदराचं स्थान व्यक्त करताना दिसणार आहेत. पण मित्रांनो, बोटाला लावल्या जाणारी शाई कोठे तयार होते..? ती कोठून येते..? हे तुम्हाला माहित आहे का..? नाही ना. तर आजच्या बातमीत आपण हेच समजून घेणार आहोत.

* बोटाची शाई भारतात तयार होते :-

निवडणुकीत बोटाला लावण्यासाठी वापरली जाणारी शाई ही प्रामुख्यानं भारतातच तयार होते. या शाईमध्ये विशिष्ट प्रकारच्या केमिकल असतं. ज्यामुळे ही शाई धुतली, तरी निवडणुकीनंतर 72 तास बोटावर शाबूत राहते. या शाईला इंडेलिबल इंक म्हणून देखील ओळखलं जातं. ही शाई भारतात दोन ठिकाणी तयार होते. एक हैदराबादमधील रायडू लॅबोरेटरीमध्ये आणि दुसरी म्हैसुरमधल्या पेंट्स आणि वार्निश लिमिटेड कंपनीमध्ये. या शाईचं उत्पादन हे प्रामुख्यानं भारतातच होत असल्यानं, जगातील जवळपास 90 टक्के देश भारतातूनच या शाईचं निर्यात करतात.

* यावेळीची निवडणूक काटे की टक्कर :-

महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत अनेक मतदारसंघात होणार आहे. महाराष्ट्रातील ही निवडणूक खरंतर यावेळी जास्त चर्चेत आली आहे. अनेक मतदारसंघात लक्षवेधी लढती होत आहेत. त्याचं कारण आहे गेल्या काही दिवसांत पडलेली राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील फूट... कारण ही फूट पडल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुका असल्याने अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याची चिन्हे आहेत.

* 20 ला मतदान 23 ला मतमोजणी :-

येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारसंघात युवा मतदार वाढल्याने ते कुणाच्या बाजून कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींकडून जोरदार प्रचार झाला. त्यामुळे मतदारांना कोण भावलं, हे येत्या 23 नोव्हेंबरला कळणार आहे...... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या