🌟अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली🌟
✍️ मोहन चौकेकर
छत्रपती संभाजीनगर: (औरंगाबाद )विधानसभा निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण ६९.६४ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आज आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते.मतदान प्रक्रिया आटोपून, सर्व मतदान यंत्रे इ. सहसाहित्य स्ट्रॉंग रुम मध्ये जमा करण्यात आले. हे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करुन माध्यमांना माहिती देण्यात आली.
*जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय (सन २०२४ मध्ये) मतदान टक्केवारी याप्रमाणे :-
१०४- सिल्लोड-८०.०८ टक्के, १०५- कन्नड-६९.३१ टक्के, १०६- फुलंब्री-७२.२२ टक्के, १०७-औरंगाबाद मध्य-५९.३५ टक्के, १०८-औरंगाबाद पश्चिम-६०.५८ टक्के, १०९-औरंगाबाद पूर्व-६०.६३ टक्के, ११०- पैठण-७७.५३ टक्के, १११- गंगापूर-७३.७७ टक्के, ११२- वैजापूर-७५,९४ टक्के. असे एकूण सरासरी ६९.६४ टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यात एकूण १६ लाख ६३ हजार १८६ पुरुष मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ६१७ जणांनी मतदान केले. तर १५ लाख ३९ हजार ४२१ महिला मतदारांपैकी १० लाख ५१ हजार ६७७ महिलांनी मतदान केले. तर इतर मतदारांमध्ये १४४ जणांपैकी ४० जणांनी मतदान केले. एकूण ३२ लाख २ हजार ७५१ मतदारांपैकी २२ लाख ३० हजार ३३४ मतदारांनी मतदान केले. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ७०.८७ तर महिलांची टक्केवारी ६८.३२ . इतर मतदारांची टक्केवारी २७.७८ टक्के होती. एकूण सरासरी टक्केवारी ६९.६४ टक्के आहे.
*सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत झालेले मतदान याप्रमाणे-*
सन २०१९ मध्ये जिल्ह्यात २८ लाख ५४ हजार २८१ मतदार होते. त्यात १५ लाख ५ हजार २७६ पुरुष, १३ लाख ४८ हजार ९७९ महिला व २६ इतर मतदार होते. त्यावेळी यापैकी १० लाख २४ हजार ६७२ पुरुष, ८ लाख ४९ हजार ७०८ महिला व इतर ५ असे एकूण १८ लाख ७४ हजार ३८५ जणांनी मतदान केले होते. एकूण टक्केवारी ६५.६७ होती.
* सन २०१९ मध्ये मतदार संघनिहाय झालेले मतदान याप्रमाणे :-
१०४- सिल्लोड- २,३६,७३६- ७४.८३ टक्के
१०५-कन्नड- २,१४,४००- ६८.२५ टक्के.
१०६-फुलंब्री- २,२७,१६४- ६९.६८ टक्के.
१०७-औरंगाबाद मध्य- १,९२,८०५- ५९.१९ टक्के.
१०८-औरंगाबाद पश्चिम-१,९८,१८२- ५९ टक्के
१०९-औरंगाबाद पूर्व- १,९४,३८१- ६०.९ टक्के.
११०-पैठण- २,१२,४९५- ७२.३ टक्के.
१११-गंगापूर- २,०२,७५२- ६४.७२ टक्के.
११२-वैजापूर- १,९५,४७०- ६३.१ टक्के.
*विधानसभा मतदारसंघनिहाय (सन २०२४)मतदानाची‘महिला,पुरुष व इतर’ निहाय विगतवारी-*
१०४- सिल्लोड-पुरुष-१,५०,५८५,महिला-१,३६०९५,इतर-२, एकूण मतदान- २,८६,६८२.
१०५- कन्नड-पुरुष-१,२२,५१९,महिला-१,०८,०९९,इतर-४,एकूण मतदान- २,३०,६२२
१०६- फुलंब्री-पुरुष-१,४१,५२८,महिला-१,२६,१७६,इतर-२,एकूण मतदान- २,६७,७०६.
१०७- औरंगाबाद मध्य-पुरुष-१,१४,९८३,महिला-१,०३,९७८,इतर-५,एकूण मतदान- २,१८,९६६.
१०८- औरंगाबाद पश्चिम-पुरुष-१,३०,०१७,महिला-१,१६,६०६,इतर-१५,एकूण मतदान- २,४६,६३८.
१०९- औरंगाबाद पूर्व-पुरुष-१,१४,१०४,महिला-१,००,९२१,इतर-४,एकूण मतदान- २,१५,०२९.
११०- पैठण-पुरुष-१,३३,९६४,महिला-१,१८,२७३,इतर-०,एकूण मतदान- २,५२,२३७.
१११- गंगापूर-पुरुष-१,४१,७३०,महिला-१,२७,३३७,इतर-८,एकूण मतदान- २,६९,०७५.
११२- वैजापूर-पुरुष-१,२९,१८७,महिला-१,१४,१९२,इतर-०,एकूण मतदान- २,४३,३७९.
* मतदान केंद्रावरील आरोग्य सेवेचा ९४७९ जणांना लाभ :-
प्रत्येक मतदान केंद्रस्थळी आरोग्य सेवांसाठी आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या सेवांचा लाभ ८३२४ मतदारांनी घेतला तर ११५५ मतदान कर्मचाऱ्यांनी अशा एकूण ९४७९ जणांनी लाभ घेतला. दरम्यान मतदान प्रक्रियेत ३४ कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी ८ जणांना खाजगी रुग्णालयात तर २६ जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
*मतमोजणीसाठी सज्जता :-
शनिवार दि.२३ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची सज्जता झाली आहे. आजच मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण करण्यात आले. इव्हीएमसाठी १२६ टेबल असतील , टपली मतपत्रिकांसाठी ७० टेबल असतील तर ईटीपीबीएस साठी १२ टेबल असतील, अशी माहिती देण्यात आली. ८५२ मतमोजणी कर्मचारी , २४२ सुक्ष्म निरीक्षक व ३००० पोलीस कर्मचारी असे ५७७८ मनुष्यबळ मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्या या प्रमाणे- सिल्लोड-२९, कन्नड-२७, फुलंब्री-२७, औरंगाबाद मध्य-२३, औरंगाबाद पश्चिम -२८, औरंगाबाद पूर्व-२४, पैठण-२६, गंगापूर-२७, वैजापूर-२६.
मतमोजणी कालावधीत व मतमोजणी नंतरही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय सुरक्षा बलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात गस्त, ड्रोनद्वारे, सीसीटिव्ही द्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ केंद्रीय बल गट तर २ राज्य राखीव पोलीस बल गट जिल्ह्यात तैनात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या