🌟नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय....!


🌟नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी🌟


नांदेड :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मजबूत गढ मानला जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील सर्वच ०९ विधानसभा मतदारसंघासह नांदेड लोकसभा मतदारसंघात देखील राज्यातील सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय झाला असून नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (महायुती) अधिकृत उमेदवार डॉ.संतुक हंबर्डे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (महाविकास आघाडी) चे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे प्रा.रवींद्र चव्हाण यांच्यात खरी लढत होती यात अटीतटीच्या लढतीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण विजयी 1457 मताने विजयी झाल्याचे समजते.

नांदेड जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे महायुतीने संपूर्ण जिल्ह्यात बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीचा नांदेड जिल्ह्यात अक्षरशः सुपडासाफ झाला जिल्ह्यातून महाविकास आघाडी सरसकट साफ झाल्याचे निदर्शनास येत आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेस पक्षाचे बलाढ्य नेते अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच पुन्हा एकदा नांदेड जिल्हा भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्हीं पक्षांच्या संयुक्त महायुतीच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे खा.अशोक चव्हाण यांचे पारडे केंद्रात पुन्हा जड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यतादेखील राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील ०९ विधानसभेसाठी दि.२० रोजी मतदान पार पडले यावेळी मागील २०१९ च्या सार्वत्रिक तुलनेने विक्रमी मतदान झाले. विधानसभेसाठी ६९.४५ तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ६७.८१ टक्के मतदान झाले. लोकसभेसाठी १९ तर विधानसभेच्या ०९ जागांसाठी १६५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी ८ पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रात सुरू झाली. ही निवडणूक विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच झाली. यात लोकसभेसह विधानसभेच्या ९ जागेवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. यात राज्यभरात सर्वांचे लक्ष लागलेल्या माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून विजय मिळविला आहे. नायगाव मतदारसंघातून भाजपचे आ.राजेश पवार यांनी विजय मिळविला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. मीनल खतगावकर यांना लढत झाली. मुखेड मतदारसंघात भाजपचे आ. तुषार राठोड, काँग्रेस उमेदवार हनमंत पा. वेटमोगरेकर व अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांच्यात लढत झाली. यात डॉ. तुषार राठोड यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या देगलूर मतदारसंघात आ.जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळविला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे निवृत्ती कांबळे, माजी आमदार तथा प्रहार जनशक्तीचे उमेदवार सुभाष सावणे यांनी लढत दिली. राज्यात भोकरनंतर चर्चेत आलेल्या लोहा विधानसभा मतदारसंघात माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजय मिळविला. त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे एकनाथ पवार, चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांनी लढत दिली. नांदेड उत्तर मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके आमदार वालाजी कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा मताधिक्य घेऊन विजय मिळविला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार, उवाठा सेनेच्या संगीत डक, वंचित आघाडीचे प्रशांत इंगोले यांनी लढत दिली. हदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे वावुराव कदम कोहळीकर यांनी काँग्रेसचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा पराभव केला. दोघांमधील ही लढत लक्षवेधी ठरली होती. यासोवत किनवट मतदारसंघात झालेल्या लढतीत आ. भीमराव केराम यांनी पुन्हा विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीचे माजी आ.प्रदिप नाईक यांचा त्यांनी पराभव केला. किनवट मतदारसंघात वातावरण बदलेल अशी चर्चा सुरू होती. परंतु केराम यांच्या विजयाने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नांदेड उत्तरसोबत चर्चेत आलेल्या तसेच काँग्रेसचे विद्यमान आ. मोहन हंबर्डे यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेड दक्षिणमध्ये अटीतटीची लढत झाली. दक्षिणमध्ये आ.हंवर्डे विरूद्ध शिवसेनेचे आनंद वोंढारकर अशी लढत होऊन वोंढारकर यांनी विजय मिळविला. विधानसभेच्या ९ जागेची मतमोजणी २४ ते २८ फेऱ्यांमध्ये पार पडली. वहुतांश मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली आहे. काही मतदारसंघाची मतमोजणी वृत्त लिहित असेपर्यंत सुरू होती. यावेळी झालेली लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी झाली. जनतेने महायुतीच्या वाजूने कौल दिल्यामुळे नांदेड नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. संतुक हंबर्डे विजयी झाल्याचे प्रथमतः हाती आलेल्या वृत्तानुसार समजले परंतु नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण 1457 मताने विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील ९ मतदारसंघातील महायुती उमेदवारांनी विजय मिळविला. यामुळे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या