🌟असो आपल्या सात पिढ्यांच्या सुखसमृद्धीसाठी आपण निर्माण केलेली भ्रष्ट बेईमानशाही आपणाला लखलाभ होवों🌟
✍🏻परखड सत्य - चौधरी दिनेश (रणजित)
आहों साहेब.......आपण वेळोवेळी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या राजकीय पक्षांच्या/सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या उद्योग व्यवसाय प्रतिष्ठानांच्या जाहिराती देतांना जातभेद/धर्मभेद,लहान थोर,डावा उजवा,समर्थक विरोधक असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक दिपावली असो की निवडणूक जाहिराती देऊन लोकशाहीचा चौथा आधारस्तंभाचे बळकटीकरण करण्याचे काम केले....आपण दिलेल्या असंख्य जाहिरातींच्या 'पैशाच्या घबाडाच ओझ' डोक्यावर वाहतांना अक्षरशः असंख्य पत्रकारांच्या पाठीचे कणे वाकले तर अनेक वृत्तपत्रांनी आपला दिपावली अंक प्रकाशित करण्यासाठी कागदाऐवजी जणुकाही चांदीच्या पत्रांचा देखील वापर केल्याचा आभास निर्माण झाला त्यामुळे आपणच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या बळकटीकरणाचे खरे आधारस्तंभ ठरलात असे कदाचित आपणास वाटत असेल त्यामुळे आपण लोकशाहीसह लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या बळकटीसाठीच जणुकाही कागदोपत्री केलेल्या असंख्य विकासकामांतर्गत केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांसह पडद्याआड दडून केलेली असंख्य घोरपाप देखील धुवून निघाली असावी आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली लोकशाहीचा चौथा स्तंभ असा दबला की त्याला त्याला सावरण्यासाठी अनेक वास्तववादी परखड लिखाण करणाऱ्या पत्रकारांना तुमच्या टोळक्यांच्या सत्काराला देखील मागील काळात सामोरं जावं लागलं तर काहींच्या छायाचित्रांवर माळा घालण्याची देखील वेळ ठोकशहांनी आणली लोकशाहीच्या बुरख्याआड दडून सत्याचे समर्थन करणाऱ्या निर्भिड निष्पक्ष जनहीतवादी पत्रकारांवर ठोकशाहीचे आसूड ओढणारा 'अ'राजकीय आसूर या देशात जन्माला घालण्यासाठीच का सरदार भगतसिंग राजगुरू सुखदेव सरदार उधमसिंघ करतारसिंघ सराभा मदनलाल धिंग्रा लाला लाजपतराय यांच्या सारख्या असंख्य महान क्रांतिकारकानी आपल्या प्राणांची आहुती दिली असेल काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असो आपल्या सात पिढ्यांच्या सुखसमृद्धीसाठी आपण निर्माण केलेली भ्रष्ट बेईमानशाही आपणाला लखलाभ होवों....जाहिराती देण्या घेण्याच सोडा जाहिराती तुम्ही दिल्या काय आणी नाही दिल्या काय त्याचा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर यत्किंचितही फरक पडणार नाही कारण प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना जाहिराती देण्यासाठी देखील तुम्हाला आपल्या आसूरीवृत्तीला साजेस एखांद दुष्कृत्यच करावं लागेल एक मात्र निश्चितच लक्षात ठेवा असत्य आणि बेईमानीच्या सिंहासनावर बसून सत्य पचविण्याची देखील क्षमता ठेवा...'अरे तुम्ही दिलेली भिख नको पण तुम्ही निर्माण केलेल्या लाचार पिसाळलेल्या टोळक्यातील कुत्री मात्र तेवढी आवरा' म्हणजे झालं .....
(संपादकीय लेख)
0 टिप्पण्या