🌟यावेळी आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे काका यांनी त्यांचा सत्कार🌟
पुर्णा (दि.१० नोव्हेंबर २०२४) - पुर्णा नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विरेश कसबे याच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सचिन इंगळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आप आज आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शनिवार दि.०९ नोव्हेंबर २०२४ रोजी डॉ रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे काका यांनी त्यांचा सत्कार केला या सत्काराला उत्तर देतांना माजी नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,माजी नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,माजी नगरसेवक विदेश कसबे,सचिन इंगळे यांनी आपआपल्या प्रभागातून येत्या दि.२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा मतदानाच्या दिवशी विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना मतांची लिंग मिळवून देऊन बहुमताने निवडून देण्याचे अभिवचन दिले....
0 टिप्पण्या